Nashik News : सावकाराला न घाबरता तक्रार करा पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांचे आवाहन

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik Commissioner of Police ankush shinde esakal
Updated on

नाशिक : तत्काळ आर्थिक गरज भागविण्यासाठी गरजू नागरिक अनधिकृतरीत्या सावकारी करणाऱ्याच्या जाळ्यात अडकतात. त्यानंतर रक्कम वसुलीसाठी तगादा सुरू होतो. अशा जाचाला कंटाळून जीवन संपविणे हा त्यावरील पर्याय नाही.

त्याविरोधात तक्रार करण्यासाठी स्वतंत्र सावकारी नियंत्रक विभाग आहे. त्याचप्रमाणे, त्रस्त नागरिकांनी थेट पोलिसांकडे येऊन तक्रार द्यावी, त्याविरोधात पोलिस कठोर कारवाई करील, असे आवाहन पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी केले आहे. (Police Commissioner Ankush Shinde appeals to report moneylenders without fear Nashik News)

सातपूरमध्ये रविवारी (ता. २९) दुपारी शिरूडे कुटुंबातील तिघा बापलेकांनी राहत्या घरातील वेगवेगळ्या खोल्यांमध्ये गळफास लावून घेत आत्महत्या केली. यामागे खासगी सावकारांच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे पोलिस तपासातून समोर येते आहे.

गेल्या दीड महिन्यातील खासगी सावकारांविरोधात हा चौथा गुन्हा आहे. सावकारीविरोधात सावकारी नियंत्रक कायदा असून, त्यासाठी उपनिबंधक कार्यालय आहे. या विभागामार्फतच अधिकृत सावकारांनाच अर्थपुरवठा करण्याची परवानगी असते.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik Crime News : दिवाळीत केलेल्या फायरिंगचा व्हिडिओ Social Mediaवर; एकाला अटक

अनधिकृत सावकारी करणाऱ्यांवर या विभागाकडून कारवाई केली जाते. त्यामुळे अशा अनधिकृत सावकारांविरोधात उपनिबंधकांकडेही तक्रार करता येते.

"अनधिकृत सावकारांकडून वसुलीसाठी जाच होत असेल तर त्रस्त नागरिकांनी नजीकच्या पोलिस ठाणे वा पोलिस आयुक्तालयात संपर्क साधावा. पोलिस अशा सावकारांविरोधात गुन्हे दाखल करून कारवाई करील." - अंकुश शिंदे, पोलिस आयुक्त

Nashik Commissioner of Police ankush shinde
Nashik Water Management : सिडकोत उद्या पाणीपुरवठा बंद!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.