Nashik News : 1 डिसेंबरपासून आयुक्तांचे हेल्मेट सक्तीचे फर्मान; पण हेल्मेट सक्ती मागे घेतलीच कधी?

Traffic Police
Traffic Policeesakal
Updated on

नाशिक : नाशिक शहर पोलिस आयुक्तालय हद्दीमध्ये लागू असलेले दुचाकीस्वारांसाठी हेल्मेट सक्तीचे आदेश मागे घेण्यात आलेले नाहीत. असे असतानाही पोलीस आयुक्तांनी पुन्हा येत्या १ डिसेंबरपासून आयुक्तालय हद्दीमध्ये हेल्मेट सक्तीचे फर्मान सोडल्याने नाशिककरांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वाहतूक शाखेच्या डासळलेली कामगिरी सुधारणे व वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बजाविण्याऐवजी विनाकारण नाशिककरांना वेठीस धरले जात असल्याची चर्चा जागरुक नाशिककरांमध्ये आहे. (police Commissioner decrees mandatory helmets from December 1 But when helmet forcibly withdrawn drivers question nashik Latest Marathi News)

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी येत्या 1 डिसेंबरपासून शहर हद्दीमध्ये दुचाकीचालकांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात मोटार वाहन कायदा अधिनियमान्वये कठोर कारवाई करण्याचे आदेश बजावले आहेत. शहरात झालेल्या गंभीर अपघातामध्ये २६१ दुचाकीस्वार गंभीररित्या जखमी झाले आहेत. हेल्मेट सक्तीबाबत माजी पोलीस आयुक्त दीपक पांडये यांनी कठोर अंमलबजावणी केली.

त्याविरोधात वाहनचालकांमध्ये रोषही वाढला होता. पांडये यांची बदलीनंतर त्यांची राबविलेल्या उपाययोजनाही थांबल्या. परंतु तेव्हाही आणि त्यानंतर आलेल्या आयुक्तांनीही हेल्मेट सक्तीचे आदेश मागे घेतलेले नव्हते.त्यामुळे पोलीस आयुक्त नाईकनवरे यांनी नव्याने हेल्मेट सक्तीबाबत दिलेल्या आदेशाबद्दल वाहनचालकांमध्येच संभ्रम निर्माण झाला आहे.

वाहतूक शाखेकडून रोजच होते कारवाई

शहर वाहतूक पोलीस शाखेकडून शहरातील प्रत्येक सिग्नल व महामार्गावर ठिकठिकाणी थांबून वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंडात्मक कारवाई केली जाते. यामध्ये सर्वाधिक कारवाई ही विनाहेल्मेट आणि विना सीटबेल्टचीच असते. अनेक सिग्नलवर तर वाहतूक पोलिसांकडून सिग्नल यंत्रणा नियंत्रित करून कोंडी सोडविण्याऐवजी दंडात्मक कारवाईवरच डोळा असतो, हे अनेकदा समोर आलेले आहे. त्यामुळे आयुक्तांनी सदरचा आदेश जारी करण्यापूर्वीच शहरात हेल्मेट सक्तीबाबतची कारवाई पोलिसांकडून सुरूच होती.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Traffic Police
Nashik News : थकबाकी भरणाऱ्यांना व्याजावर 100 टक्के सवलत; मालेगाव मनपाकडून कार्यवाही

महामार्गावरील गस्तीमुळे अपघातात घट

शहरामध्ये प्रायोगिक तत्वावर पोलीसांनी राष्ट्रीय महामार्ग ३ वर गस्त वाढविली असता प्राणांतिक अपघातांमध्ये ब-यापैकी घट झाल्याचे दिसून आल्याचा दावा शहर पोलिसांनी केला आहे. वाढविलेल्या गस्तीमुळे काही वाहन चालकांचा जीव वाचलेला आहे. यापूर्वीही हेल्मेट वापराबद्दल पोलीस आयुक्तालयामध्ये वेळोवेळी मोहिमा राबविण्यात आल्या. त्या-त्यावेळी अपघाताच्या संख्येमध्ये, प्राणांतिक अपघातामध्ये व गंभीर दुखापतीमध्ये घट झाल्याचे आढळून आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

आयुक्तांचे आवाहन

सुजान नागरिकांना सक्ती करण्याची आवश्यकता नाही. दुचाकीस्वारांचे होणारे अपघात व त्यामध्ये होणारी प्राणहानी, गंभीर जखमा व त्यामुळे येणारे अपंगत्व या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुध्द पोलीसांना नाईलाजास्तव कडक कारवाई करणे क्रमप्राप्त ठरते. सर्व दुचाकीस्वारांनी योग्य प्रतीचे हेल्मेट वापरुन वाहतूक नियमांचे पालन करावे, असे आवाहन पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे यांनी केले आहे.

Traffic Police
Nashik Crime News : संस्थाचालकानेच केला निवासी वसतिगृहातील 14 वर्षीय मुलीवर बलात्कार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.