Nashik News: शहरात स्वतंत्र पोलिस आयुक्तालय झाल्यास गुन्हेगारीला आळा बसून मालेगावची प्रतिमा उजळू शकेल. गुन्हेगारी कमी झाल्यास ‘संवेदनशील’ मधून मालेगावची मुक्तता होऊन मोठ्या उद्योग व्यवसायांच्या येण्याच्या वाटा मोकळ्या होतील. रोजगार वाढीबरोबरच शहराचे अर्थकारण बळकट होण्यास देखील मदत होईल.
प्रस्तावित मालेगाव जिल्ह्यासाठी एक पाऊल पुढे पडून एकूणच या भागातील विविध क्षेत्रांना विकासाची मोठी संधी असेल. गुन्हेगारीवर नियंत्रण येताच बाहेरील मोठ्या उद्योजकांना आश्वासित करता येवू शकेल. एकूणच प्रस्तावित पोलिस आयुक्तालय मैलाचा दगड ठरु शकेल. (Police Commissionerate office can control crime malegaon nashik news)
अलिकडच्या काळात मालेगावने शांततेची कूस धरली असली तरी शहरातील लहानमोठ्या गुन्ह्यांचे प्रमाण कायम आहे. घरफोडी, वाहनचोरी, चैन स्नॅचिंग, मोबाईल चोरी हे प्रकार तर नित्याचेच झाले आहेत. बहुसंख्य गुन्ह्यांना नशा कारणीभूत ठरत आहे. राज्यासह देशात मालेगावची ओळख दंगल, बॉम्बस्फोट व गुन्हेगारीचे शहर म्हणून आजही कायम आहे. मालेगावची प्रतिमा पुसण्यासाठी गुन्हेगारीला आळा घालणे गरजेचे आहे.
यंत्रमागाचे मँचेस्टर म्हणून शहराची ओळख असली तरी प्रक्रिया उद्योग नसल्याने हा व्यवसाय मर्यादितच आहेत. येथे मजूर व कुशल कामगार उपलब्ध आहेत. शहरात यंत्रमागाचे हब होऊ शकते. भिवंडी, सोलापूर, इचलकरंजी सारखा यंत्रमाग विकसित होवू शकेल. राजकारण्यांची मानसिकता व गुन्हेगारांवर वचक बसल्यास शहराची संवेदनशील ही प्रतिमा बदलू शकेल.
येथे अप्रिय घटना घडल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना येण्यास दोन ते अडीच तासाचा वेळ लागतो. आयुक्त दर्जाचा अधिकारी असल्यास तत्काळ निर्णय घेता येईल. पोलिस ठाण्यांची संख्या वाढून मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ उपलब्ध होईल. यातून गुन्हेगारीला आळा बसून कायदा व सुव्यवस्था राखणे सोयीचे होवू शकेल.
मुंबई-आग्रा महामार्गाला लागून मालेगाव हे दाट लोकवस्तीचे शहर आहे. उद्योगांसाठी पुरेशी जागा, पाणी, कुशल कामगार आदी बाबी अनुकूल आहेत. शहराची प्रतिमा बदलली तर मोठ्या उद्योजकांना आश्वासित करता येऊ शकेल. शहराचे विस्तारीकरण होऊन रिअल इस्टेटला चालना मिळेल. नाशिक, पुणेसारख्या ठिकाणी घरे घेण्याची मानसिकता बदलून येथील बांधकाम व्यवसायाला बळकटी मिळू शकेल.
"मालेगावात पोलिस आयुक्तालय झाल्यास त्याचा मालेगावकरांना मोठा फायदा होईल. गुन्हेगारीला प्रचंड आळा बसेल. मालेगावची प्रतिमा बदलली तर मोठ्या उद्योग व्यवसायांना येथे वाव आहे. मोठे उद्योग स्थिरावल्यानंतर येथील सर्वच क्षेत्रांचा विकास झपाट्याने होईल." - रवीश मारू, संचालक, मालेगाव औद्योगिक वसाहत
पोलिस आयुक्तालयामुळे गुन्हेगारी कमी होईल. सर्वात महत्त्वाचे म्हणजे लोकांमध्ये विश्वास निर्माण होईल. शहराच्या चारही बाजूने विस्तारीकरण वाढेल. यातून बांधकाम क्षेत्राला चालना मिळेल. परिणामी रोजगार व शहराची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. - विवेक देवरे, अध्यक्ष, क्रेडाई मालेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.