तुषार भोसलेविरोधात जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत तक्रार

tushar bhosale
tushar bhosalesakal news
Updated on

मालेगाव/नांदगाव (जि. नाशिक) : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरोधात आक्षेपार्ह व देशातील जनतेच्या भावना दुखावतील अशा प्रकारची पोस्ट सोशल मीडियावर व्हारयल करणाऱ्या भाजपच्या तुषार भोसले याच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे मालेगाव तालुका पोलिस ठाण्यासह जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.


येथील तालुका पोलिस ठाण्यात पूर्व भागाचे युवक जिल्हाध्यक्ष अरुण अहिरे, नवनाथ शिल्लक यांनी पोलिस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्याकडे तक्रार दिली. पवार राज्याचेच नव्हे, तर देशाचे नेते आहेत. शेतकऱ्यांसोबतच विविध घटकांसाठी देशात अनेक उपयोगी निर्णय पन्नास वर्षांत त्यांनी घेतले आहेत. त्यांना मानणारा वर्ग हा कोट्यावधीच्या घरात आहे. सोशल मीडियावर काही नेटकरी महाविकास आघाडीचे सरकार आल्यामुळे अस्वस्थ होवून कायदा मोडून वैयक्तिक पातळीवर टीका करतात. भोसलेंच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा वाईट परिणाम होवू नये, तक्रार दाखल करण्यात आली आहे. नांदगावला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विजय पाटील व युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सोपान पवार यांनी याबाबत फिर्याद दाखल केली. दरम्यान, कळवण, देवळा, चांदवड, नांदगाव, पिंपळगाव (बसवंत), सुरगाणा येथेही तालुकाध्यक्षांनी तक्रारी दिल्या. गुन्हे दाखल न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष पुरुषोत्तम कडलग, तालुकाध्यक्ष गणेश गायधनी, विधानसभा अध्यक्ष तुषार खांडबहाले, जिल्हा उपाध्यक्ष विशाल गायकर, तालुका कार्याध्यक्ष आकाश पिंगळे, विधानसभा उपाध्यक्ष राज पगार आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

tushar bhosale
नाशिक शहरातील अनधिकृत होर्डिंगच लपवाछपवी

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांचा वारसा जपत पुरोगामी महाराष्ट्र घडविला. अनेक युवक-युवती ज्यांची प्रेरणा घेतात, त्यांच्याबद्दल तुषार भोसले व त्यासारखे अजून कोणी आमच्या शक्तिस्थळांवर आक्षेपार्ह आणि बदनामीकारक उल्लेख करत असतील, तर त्यांना निशिक्चत धडा शिकवू.
- पुरुषोत्तम कडलग, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस, नाशिक

tushar bhosale
नाशिक : मनमाडच्या बाल सुधारगृहातून चार संशयित मुले फरार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.