Nashik Crime News : कर्डिल खून प्रकरणात पोलिसांना मिळेना धागेदोरे

Crime News
Crime Newsesakal
Updated on

नाशिक : अंबड हद्दीतील कर्डिल मळ्यात वयोवृद्ध शेतकरी बच्चू कर्डिल यांच्या खून करण्यात आल्याच्या घटनेला तीन दिवस उलटूनही शहर पोलिसांच्या हाती काहीही धागेदोरे मिळू शकलेले नाहीत. त्यामुळे गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी पोलिस अजूनही अंधारातच चाचपडत तपास करीत आहेत.

दरम्यान, संशयितांनी नेलेली पत्र्यांची कोठीही पोलिसांच्या हाती लागलेली नाही. कोठीत कर्डिल यांच्या मालमत्तेची कागदपत्रे असल्याने, स्थावर मालमत्तेतूनच खून करण्यात आला असावा असाही प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. परंतु, अद्याप कोणतीही ठोस माहिती मिळत नसल्याने पोलिस तपासाच्या साऱ्या शक्यता तपासून पाहत आहेत. (Police Did Proof of Kardil Murder Case Nashik Crime News)

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Crime News
Nashik Crime News : आदिवासी मुलींवरील अत्याचार प्रकरणाची नाशिक भाजप महिला आघाडीकडून दखल

बच्चू सदाशिव कर्डिल (६८) यांचा गेल्या शुक्रवारी (ता. २५) रात्री अज्ञात संशयितांनी घातक हत्याराने डोक्यात वर्मी मारून खून केला. यावेळी चोरट्यांनी घरातील तीन पैकी एकच कोठी उचलून पोबारा केला आहे. घरातील तीनपैकी तीच कोठी कशी काय नेली, यावरून घरातील वस्तूंची माहिती संशयितांना असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.

चोरून नेलेली कोठीचाही पोलिसांनी शोध घेतला. त्यासाठी घरापासूनचे बऱ्याच अंतरावरील जंगल, नाले परिसरात पोलिसांनी शोध घेऊनही सदरील कोठी मिळून आलेली नाही. रोकड व दस्तऐवज घेऊन चोरटे कोठी फेकून देतील असा प्राथमिक अंदाज होता.

तोही फोल ठरला आहे. तरीही पोलिस सकारात्मकतेने आणि साऱ्या शक्यता गृहित धरून पोलिस तपास करीत आहेत. काही पथके परगावी रवाना करण्यात आलेली आहे. त्यांच्याही हाती अद्याप काही धागेदोरे लागू शकलेले नाहीत. मात्र काही दिवसात गुन्ह्याची उकल होईल असा विश्‍वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

Crime News
Nashik News : पोलिस भरतीचे Server Down; दोन दिवसांवर अंतिम मुदतीमुळे उमेदवारांना मनस्ताप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.