नाशिक : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे-पाटील यांनी येत्या २४ तारखेला ‘चलो मुंबई’ची हाक दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलीस यंत्रणा सतर्क झाली आहे.
शहरातील मराठा आंदोलनाशी जोडले गेलेल्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या हालचालींवर पोलिसांची नजर ठेवल्याचे समजते. वेळप्रसंगी नोटीसा बजावून कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले जाण्याची शक्यता आहे. (Police eyes on Maratha reservation protesters nashik news)
मराठा आरक्षणासाठी आर या पारची लढाई करण्यासाठी मनोज जरांगे -पाटील यांनी चलो मुंबईची हाक दिली आहे.
राज्यातील समस्त मराठा समाजाला येत्या २४ तारखेला मुंबईमध्ये दाखल होण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.
मनोज जरांगे -पाटील यांच्या मनधरणीचा प्रयत्न शासनाकडून होत असला तरी अद्यापही ते त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठकही पार पडली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनात नाशिकमधून शेकडो कार्यकर्ते, पदाधिकारी जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांकडून पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या हालचालीवर बारकाईने नजर ठेवली जात आहे.
तसेच वेळप्रसंगी या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून प्रतिबंधात्मक नोटिसा बजावून कारवाई करण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.
मात्र अद्यापतरी पोलिसांकडून नोटीसा बजाविण्यात आलेल्या नाहीत. मात्र, येत्या दोन-तीन दिवसात पोलिसांकडून अशास्वरुपाचा नोटीसा बजाविल्या जाण्याची शक्यता आहे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.