Agriculture Exam Copy Case : कृषी विभागाच्या शुक्रवारी (ता. २२) झालेल्या परीक्षेदरम्यान आणखी एका हायटेक कॉपीबहाद्दराला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडे मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स डिव्हाइस सापडल्याने त्याचा साथीदार परीक्षा केंद्राबाहेर असण्याची शक्यता आहे. (police finding another suspect in copy case in agriculture exam nashik news)
त्यादृष्टीने म्हसरूळ पोलिस तपास करीत आहेत. दरम्यान, संशयित कॉपीबहाद्दरचा संबंध यापूर्वी तलाठी परीक्षेदरम्यान सापडलेल्या गुसिंगे संशयितांबरोबर असण्याच्या शक्यतेचीही पडताळणी पोलिसांकडून केली जात आहे.
कृषी विभागातील वरिष्ठ लिपिक १०५, तर सहाय्यक अधीक्षक ५३ पदांकरिता शुक्रवारी परीक्षा घेण्यात आली. दिंडोरी रोडवरील एका नामांकित महाविद्यालयात टीसीएस कंपनीच्या माध्यमातून ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली असता मोबाईल व इलेक्ट्रॉनिक डिव्हाइससह पोलिसांनी संशयित सूरज विठ्ठलसिंग जारवाल (वय २३, रा. जारवालवाडी सागरवाडी, पो. धासला, ता. बदनापूर, जि. जालना) यास ताब्यात घेतले आहे.
त्यास न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. त्याच्याकडे सापडलेल्या मोबाईलमधील डाटा तपासला जात आहे. त्याचप्रमाणे, संशयित जारवाल परीक्षा केंद्रात गेला असता तर तो इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसचा वापर करून प्रश्नपत्रिका बाहेर कोणाला पाठविणार होता, याचा शोध पोलिस घेत आहेत.
तसेच, म्हसरूळ परिसरात घेण्यात आलेल्या तलाठी परीक्षेच्या केंद्रातून यापूर्वी एकाला अटक करण्यात आली आहे. त्या गुसिंगे संशयिताशी जारवाल याचा संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करीत आहेत. जारवाल यास न्यायालयाने एका दिवसाची पोलिस कोठडी सुनावली असून, सोमवारी (ता. २५) त्यास पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.