प्रथमोपचारातून पोलिसांना मिळाला Lifelineचा मंत्र; श्री काळाराम देवस्थानाच्या महाआरोग्य शिबिराचा समारोप

Deputy Commissioner of Police Krishna Kumar Chavan, Dr. Sitaram Kolhe, Dhananjay Pujari, Mandar Janorkar etc.
Deputy Commissioner of Police Krishna Kumar Chavan, Dr. Sitaram Kolhe, Dhananjay Pujari, Mandar Janorkar etc.esakal
Updated on

नाशिक : धकाधकीच्या जीवनात अपघातांच्या व अन्य दुर्घटनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यातून अनेक निष्पापांना प्राण गमवावे लागले आहे. केवळ अपघातातच नव्हे तर हृदयक्रिया बंद पडून अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे.

हीच बाब हेरत काळाराम मंदिरातील महोआरोग्य शिबिराच्या शेवटच्या दिवशी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी पोलिस अधिकाऱ्यांसह पंचवटी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिसांना प्रथमोपचाराचे विशेषतः हृदयक्रिया बंद पडल्यावर काय करावे, याबाबत प्रशिक्षण दिले.

आरोग्य शिबिराचे गेले तीन दिवस सुरू असलेल्या महाआरोग्य शिबिराचा बुधवारी (ता. ४) समारोप झाला. (Police got Lifeline mantra from First Aid Maha Arogya Camp of Shree Kalaram Devsthan concluded nashik news)

श्री काळाराम संस्थानतर्फे महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरातील नेत्ररोग, ईसीजी, रक्तदान, चेकअप, मोफत चष्मेवाटप शिबिराचा लाभ अनेकांनी घेतला. शेवटच्या दिवशी आयोजित आरोग्य शिबिराचे उद्‌घाटन पोलिस उपायुक्त किरणकुमार चव्हाण, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, आयएमचे अनिरुद्ध भांडारकर, पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरिक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या हस्ते झाले.

या वेळी विश्‍वस्त मंदार जानोरकर, धनंजय पुजारी यांच्याहस्ते पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी पोलिस अधिकाऱ्यांसह पोलिस कर्मचाऱ्यांना ऋषिकेश हॉस्पिटल, एसएमबीटी आयुर्वेद महाविद्यालय, दंत महाविद्यालयातील डॉक्टरांनी प्रथमोपचाराचे प्रशिक्षण दिले.

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

Deputy Commissioner of Police Krishna Kumar Chavan, Dr. Sitaram Kolhe, Dhananjay Pujari, Mandar Janorkar etc.
Chhagan Bhujbal | ब्रह्मगिरीस ‘इको सेन्सेटिव्ह झोन’ जाहीर करा : छगन भुजबळ

यात डॉ. दिनेश देवरे, डॉ. महेश आहेर, डॉ. प्रतीक शेटे, डॉ. पंकज राणे, डॉ. श्रेया रघुवंशी, डॉ. स्वाती गोठे, डॉ. चैताली तरवाडे, डॉ. दर्शना बोरकर, डॉ. वृषाली ठाकूर, डॉ. श्रुती शुक्ला आदी सहभागी झाले होते.

"अतिशय चांगला उपक्रम असून याचा आम्हाला लाभ होईल. कारण कोणत्याही घटनेचे प्रथमदर्शी पोलिसच असतात. असे उपक्रम सर्वत्र व्हावेत."

- डॉ. सीताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरिक्षक, पंचवटी

Deputy Commissioner of Police Krishna Kumar Chavan, Dr. Sitaram Kolhe, Dhananjay Pujari, Mandar Janorkar etc.
Chhagan Bhujbal | शरद पवार यांना जाणता राजा म्हणण्यात गैर काय? : भुजबळ यांचा सवाल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.