Nashik Farmer Helpline : जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. पोलिसांनी शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू केली आहे. शेतकऱ्यांना विनाप्रवास घरबसल्या ६२६२ ७६ ६३६३ या ‘बळीराजा’ हेल्पलाईनवर कॉल करताच पोलिसांची मदत मिळेल.
जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात कारवाईसाठी ग्रामीण पोलिसांनी यापूर्वीच ६२६२ २५ ६३६३ ही ‘खबर’ हेल्पलाईन सुरू केली होती. (Police has started separate helpline for farmers nashik news)
या हेल्पलाईनच्या माध्यमातून अनेक जागरूक नागरिकांनी आपापल्या भागातील अवैध धंद्यांची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे ग्रामीण पोलिसांना अवैध व्यवसायांविरुद्ध कारवाईसाठी मोठी मदत झाली.
जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना अनेक कामांसाठी पोलिस ठाण्यात व इतर कार्यालयांमध्ये जावे लागते. बऱ्याचदा आपले काम नक्की कोणाकडे प्रलंबित आहे, याची माहिती शेतकऱ्यांना मिळत नाही. परिणामी, त्यांना अकारण प्रवास खर्च सोसावा लागतो व त्यांचा वेळही खर्च होतो. ही बाब लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी आता ६२६२ ७६ ६३६३ ही नवीन ‘बळीराजा’ हेल्पलाईन सुरू केली आहे.
या हेल्पलाईनचा पालकमंत्री दादा भुसे यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बी. जी. शेखर-पाटील, पोलिस अधीक्षक शहाजी उमाप, अप्पर पोलिस अधीक्षक माधुरी कांगणे आदी उपस्थित होते.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
पोलिसांचे आवाहन
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी नाशिक ग्रामीण पोलिस दल कटिबद्ध असून, शेतकरी बांधवांनी आपल्या तक्रारी ‘बळीराजा’ हेल्पलाईनच्या माध्यमातून मोकळेपणाने मांडाव्यात, असे आवाहन नाशिक ग्रामीण पोलिसांतर्फे करण्यात आले आहे.
पहिला कॉल पालकमंत्र्यांचा
‘बळीराजा’ हेल्पलाईनवर पहिला कॉल करून पालकमंत्री भुसे यांनी, समोरून शेतकरी बोलत असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेली ही हेल्पलाईन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणुकीसाठी महत्त्वाची भूमिका बजावेल, अशी भावना भुसे यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.