Nylon Manja Ban : खबरदार! नायलॉन मांजा विकाल तर थेट तडीपार व्हाल!

City police team issuing notices to kite sellers at yeola.
City police team issuing notices to kite sellers at yeola.esakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : जीवघेणा असलेल्या नायलॉन मांजावर शासनाने बंदी घातली आहे. तरीही दोरा विक्रीच्या तक्रारी येत असून शहरात आतापर्यंत ८ ते १० जण नॉयलॉन दोऱ्याने जखमी झाल्याच्या घटना घडल्याने शहर पोलिसांनी आज तब्बल १५ पतंग साहित्य विक्रेत्यांना नोटीसा दिल्या आहेत.

वेळप्रसंगी अशा विक्रेत्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येईल असा इशाराही पोलिसांनी दिला आहे. (Police in action mode on nylon manja ban notices from police to kite material sellers nashik news)

पतंगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात पतंग, मांजा व पतंगबाजीसाठी लागणारे इतर साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना नायलॉन मांजा विक्री वा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा नोटिसा सहायक पोलिस निरीक्षक नितीन खडांगळे यांनी बजावल्या आहेत. खंडांगळेसह पोलिस नाईक चंद्रकांत निर्मळ, संदीप पगार, मधुकर जेठे, बाबा पवार आदी पोलिसानी थेट विक्रेत्यांच्या दुकानात जाऊन नोटिसा बजावत तंबी देखील दिली आहे.

नायलॉन दोऱ्यामुळे शहर व परिसरात नागरिक व पशुपक्षांना धोका निर्माण झाला आहे. काही नागरिक, लहान मुले जखमी झाले आहेत. या संदर्भात अप्पर जिल्हादंडाधिकारी यांचेकडील आदेशान्वये पतंग उडविण्यासाठी नायलॉन मांजा वापरावर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे अशा प्रकारचा, स्वरूपाचा मांजा निर्माती, विक्री अगर वापर करू नये.

आपणाकडे अथवा आपल्या दुकानात अशा प्रकारचा कोणताही नायलॉन मांजा विक्री अगर वापर करताना दिसून आल्यास आपणा विरुद्ध प्रचलित कायदयानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे नोटीसमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा : योग्य वेळेतच करा इच्छापत्र आणि व्हा चिंतामुक्त

City police team issuing notices to kite sellers at yeola.
Nashik News : सिन्नर ‘जिंदाल’च्या मशिनमध्ये अडकून कामगाराचा मृत्यू; औद्योगिक सुरक्षाचे तीनतेरा

नाशिकमध्ये दहा नायलॉन मांजा विक्रेत्यांना शहर पोलिस आयुक्त अंकुश शिंदे यांनी तडीपार केल्यानंतर नायलॉन मांजा विक्रेत्यांचे धाबे दणाणले असून येवल्यात देखील चोरीछुपे पद्धतीने नायलॉन मांजा विक्री होत असल्याच्या अनेक तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत.

यानुषंगाने शहर पोलिस चांगलेच ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. शहरातील नागड दरवाजा, थिएटर रोड, मेन रोड आदी भागातील प्रमुख पतंग व दोरा विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी कलम १४९ प्रमाणे नोटीसा दिल्या आहेत.

यापूर्वीही गुन्हे दाखल झालेल्यांवर वेळप्रसंगी तडीपारीची ही कारवाई करण्यात येईल असे सांगत नागरिकांनी देखील हा मांजा वापरू नये व स्वतःचा इतरांच्याही जीवाला धोका निर्माण करू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक खडांगळे यांनी केले आहे.

"राज्यात पतंगासाठी हे शहर प्रसिद्ध असून तीन दिवस येथे जल्लोषात उत्सव साजरा होतो. या काळात महिलांना मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होत असल्याच्या तक्रारी तसेच जखमी होण्याच्या घटना घडत असल्याने नायलॉन मांजा विक्रेते व वापरणाऱ्यांवर पोलिस नजर ठेवून आहेत, प्रसंगी कायदेशीर कारवाई केली जाणार आहे."

-नितीन खंडागळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक, येवला

City police team issuing notices to kite sellers at yeola.
Winter Season : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका; निफाड अन् जळगावमध्ये 5 अंश सेल्सिअसपर्यंत पारा घसरला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()