वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!

lam road.jpg
lam road.jpg
Updated on

नाशिक : देवळाली कॅम्प येथे लॅम रोड रस्त्याची दुरावस्था झालेली होती त्यामुळे नागरिकांची गैरसोय व्हायची. याबाबत संबंधीत यंत्रणेला कळवूनही उपयोग न झाला नाही. एरव्ही कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणारे पोलिस अधिकारी व त्यांचे सहकारी इतरांवर हुकुम सोडतात. इतरांची हजेरी घेतात. त्यांना नागरिकांच्या अडचणींशी काहीच देणेघेणे नसते असे नेहमीच ऐकायला मिळते. मात्र येथे ड्युटीवर असलेल्या पोलिसांनी स्वतःच हाती फावडे घेऊन रस्ता दुरुस्ती केली. हे पाहून काही नागरीकही त्यांच्या मदतीला आले.

वाहनचालकांची अडचण दुर 

नुकत्याच झालेल्या पावसामुळे येथे पाणी वाहून जात असल्याने मोठा खड्डा झाल होता. यापूर्वी हा रस्ता कामासाठी खोदलेला होता. त्यामुळे वाहनचालकांची वाहने पुढे नेतांना अतिशय कसरत होत होती. याबाबत संबंधितांना रस्ता दुरुस्तीसाठी सूचना केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत होते. त्याचा पोलिसांनाही त्रास होत होता. यासंदर्भात त्याची दखल घेत येथे ड्युटीवर असलेल्या पोलिस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलिस उपनिरिक्षक नंदू कदम यांनी स्वतः दोन ट्रॅक्‍टर माती व मुरुम मागविली. त्याने ते खड्डे भरले. नजीकच्या व्यक्तींकडून फावडे घेऊन रस्त्याची माती व्यवस्थित करीत रस्त्याचे सपाटीकरण केले. स्वतः पोलिस निरीक्षक रस्ता नीटनेटका करीत असल्याचे पाहून तेथून जाणारे अशोका टायर्सचे संचालक राजूशेख गडाख यांनीही त्यांना मदत केली. रस्ता सुस्थितीत आल्यावर बॅरीकेडींगला वळसा घालून जातांना वाहनचालकांची अडचण दुर झाली. 

पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा

कोरोना संसर्गाच्या अडथळ्यासाठी लष्करी हद्द असलेल्या देवळाली कॅन्टोनमेंट भागात अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यासाठी लष्कराचे जवान त्यांच्या हद्दीत अतिशय दक्ष आहेत. मात्र लगतच्या कॅन्टोन्मेंट भागातही पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा केला जातो. त्यामुळे देवळालीच्या सर्व रस्त्यांवर कडक तपासणी होते. लॅम रोडवरील भैरवनाथ मंदिराजवळ बॅरिकेडींग लावण्यात आले आहे. त्यामुळे वळसा घेऊन वाहने पुढे जातात.

एरव्ही कायदा आणि सुव्यवस्थेची अंमलबजावणी करणारे पोलिस अधिकारी व त्यांचे सहकारी इतरांवर हुकुम सोडतात. इतरांची हजेरी घेतात. त्यांना नागीरकांच्या अडचणींशी काहीच देणेघेणे नसते असे नेहमीच ऐकायला मिळते. मात्र सगळेच पोलिस अधिकारी तसे नसतात, याचा अनुभव दैवळाली कॅम्पच्या भैरवनाथ मंदिराच्या पोस्टवरील अधिकाऱ्यांचा पुढाकार व इतरांवर विसंबून न राहता स्वतः रस्त्याची समस्या सोडविण्याचा अनुभव पाहता. परिसरातील नागरिकांनीही त्यांचे आभार मानले. या कामाचे परिसरात कौतुकही होत आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.