Nashik News : संपूर्ण बाजारपेठेवर पोलिसांची तीक्ष्ण नजर! गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिस कॅमेरा’ उपक्रम

Ongoing work of Bhadrakali police to put up police camera stickers on shops in the market
Ongoing work of Bhadrakali police to put up police camera stickers on shops in the marketesakal
Updated on

जुने नाशिक : बाजारपेठेत घडणाऱ्या गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांकडून पोलिस कॅमेरा’ उपक्रम राबविला जात आहे. ‘एक कॅमेरा शहरासाठी’ अंतर्गत प्रत्येक दुकानांवर एक अतिरिक्त कॅमेरा लावण्याच्या सूचना करण्यात आल्या.

तसेच, दुकानावर पोलिस कॅमेरा आशय असलेले स्टिकर लावण्यात येत आहे. संपूर्ण बाजारपेठ पोलिसांच्या नजरेत आली आहे. असा संदेश या स्टिकरच्या माध्यमातून देण्यात आला आहे. (police keeping sharp eye on entire market Police Camera initiative to prevent crime Nashik News)

सीसीटीव्ही फुटेजमुळे विविध गुन्ह्याची उकल होण्यास मदत होते. दरम्यान १५ जानेवारीला रात्री दहिपूल परिसरात घडलेल्या मारहाण आणि दगडफेक घटनेच्या बाबतीतही असाच प्रकार घडला.

त्यामुळे भविष्यात घडणाऱ्या गुन्हेगारीशी निगडित दुर्दैवी घटना टाळण्यासाठी आणि गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी प्रत्येक दुकानावर सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यात येत आहे. पोलिस कॅमेरा असे त्याचे नामकरण करण्यात आले आहे.

अशा आशयाचे पोलिसांकडून स्टिकर तयार केले आहे. गुरुवार (ता.२) पासून असे स्टिकर बाजारपेठेतील प्रत्येक दुकानावर लावण्यात येत आहे. जेणेकरून त्यावर सर्वांची नजर पडून घडणाऱ्या घटना आणि व्यक्तींवर पोलिसांची नजर आहे. असा संदेश त्या माध्यमातून दिला जात आहे.

भद्रकाली पोलिसांकडून प्रत्यक्ष व्यापाऱ्यांची भेट घेत त्यांच्या दुकानावर स्टिकर चिटकविले जात आहे. तसेच ज्या दुकानांवर अद्याप कॅमेरे लावण्यात आलेले नाही. त्यांना पत्र देऊन त्वरित कॅमेरा लावण्याचा सूचना करण्यात आल्या आहे. सुमारे ३० व्यापाऱ्यांना पत्रवाटप करण्यात आले आहे. तर सुमारे १०० दुकानांवर पोलिस कॅमेरा स्टिकर लावण्यात आले आहे.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

Ongoing work of Bhadrakali police to put up police camera stickers on shops in the market
Dhule Mahamarathon : मॅरेथॉन स्पर्धेचा मार्ग मोकळा; वाहनांसह पार्किंगसाठी सुविधा जाहीर

पोलिसांकडून तपासणी

केवळ कॅमेरा आणि स्टिकर लावून पोलिस थांबणार नाही. आठ ते पंधरा दिवस अशी टप्प्याटप्प्याने पोलिस कर्मचारी अधिकारी बाजारपेठेत भेट देऊन दुकानातील फुटेज तपासणी करणार आहेत.

बीट मार्शल कर्मचाऱ्यांचीदेखील दैनंदिन गस्त करत नजर राहणार आहे. त्यांना कुठल्या गोष्टीचा संशय आल्यास त्यांच्याकडून लगेचच डीव्हीआरमधील फुटेज तपासणी करण्यात येणार आहे. यामुळे बाजारपेठेवर पोलिसांची तीक्ष्ण नजर राहणार आहे, असे स्पष्ट होत आहे.

Ongoing work of Bhadrakali police to put up police camera stickers on shops in the market
Nashik News : इगतपुरी- भुसावळदरम्यान तिसरी रेल्वेलाइन; नव्या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणासाठी तरतूद

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.