Nashik Bribe Crime : सरकारवाड्याच्या पोलीस नाईकला पाचशेची लाच घेताना अटक

Bribe crime
Bribe crimeesakal
Updated on

नाशिक : वाहनाची कागदपत्रे गहाळ झाल्याने त्याची नोंद करून वाहन नोंदणीचे प्रमाणपत्र देण्यासाठी ५०० रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस नाईकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरकारवाडा पोलिस ठाण्यातच अटक केली. मधुकर दत्तू पालवी (४२) असे संशयित लाचखोर पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून सरकारवाडा पोलिस ठाण्यात कार्यरत होता. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसातच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Police Naik of Sarkarwada arrested while taking bribe of Rs 500 Nashik Bribe Crime)

हेही वाचा : सोंगी भजनाच्या माध्यमातून शांतारामबापूंनी घडवले दत्तदर्शन...

Bribe crime
Nashik News : भारतरत्न राजीव गांधी उद्यान; समस्या नाही, निदान गावगुंडांना तरी आवरा!

तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांच्या वाहनाचे कागदपत्र गहाळ झाले होते. सदरची कागदपत्रांची नोंद गहाळ वहीमध्ये करून त्याचे प्रमाणपत्र देण्यासाठी ते सरकारवाडा पोलीस ठाण्यात गेले होते. त्यावेळी लाचखोर पालवी याने तक्रारदाराकडे ५०० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

विभागच्या पथकाने सरकारवाडा पोलिस ठाण्यच्या आवारातच सापळा रचला आणि गुरुवारी (ता.२२) दुपारी ५०० लाचेची रक्कम घेताना पालवी यास रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संदीप घुगे हे तपास करीत आहेत.

Bribe crime
Nashik Crime News : बळजबरीने कर्जवसुली अन् कर्जदाराच्या पत्नीचाही विनयभंग! सावकाराला अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()