Nashik Police News: नाशिकला बिन वेतनवाढीचे फौजदार

Police PSI
Police PSIesakal
Updated on

नाशिक : खात्यांतर्गत पोलिस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती मिळालेल्या जिल्ह्यातील फौजदारांना (ग्रेड पीएसआय) अन्य जिल्ह्यांप्रमाणे वेतन स्तर १४ लागू झालेला नाही, बढतीनंतर अधिकाऱ्यांचे काम वाढले असले तरी पदोन्नती मिळूनही पूर्वीच्या वेतन स्तरावरच त्यांना समाधान मानावे लागत आहे.

पत्रव्यवहार करूनही त्यावर मार्ग निघत नसल्याने पदोन्नती मिळालेल्या फौजदारांमध्ये नाराजी आहे. पोलिस दलात ३० वर्षे सेवा पूर्ण केलेले, तसेच सहायक उपनिरीक्षक पदावर किमान तीन वर्षे सेवा पूर्ण करणारे, आश्वासित प्रगती योजनेच्या लाभानुसार पोलिस उपनिरीक्षक संवर्गाच्या पदाची वेतनश्रेणी घेत असलेले असे तीनही निकष पूर्ण करणाऱ्या सहायक उपनिरीक्षकांना श्रेणी पोलिस निरीक्षक तथा उपनिरीक्षक यांना श्रेणी पोलिस निरीक्षक तथा ग्रेड पीएसआय संबोधण्याचे आदेश गृहविभागाने दिले आहेत.

Police PSI
Police FIR: पोलिसांनी तुमची तक्रार (FIR) नोंदवून न घेल्यास ‘इथे’ मागता येईल दाद, जाणून घ्या प्रक्रिया

राज्यभरातील पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या सहायक उपनिरीक्षकांना ग्रेड पीएसआयपदी बढती मिळाली. त्यात नाशिक ग्रामीणच्या १२० अधिकाऱ्यांना उपनिरीक्षकाप्रमाणेच गणवेश निश्चित करण्यात येऊन एक स्टार देण्यात आला आहे.

उपनिरीक्षक आणि श्रेणी उपनिरीक्षकाच्या फक्त खांद्यावरची फीत बदलली, उपनिरीक्षकांना लाल व निळी फीत असली तरी श्रेणी उपनिरीक्षकांना मात्र लाल फीत आणि एक स्टार मिळाला. महासंचालकांच्या बढती आदेशात श्रेणी उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती देताना वेतन मेट्रिक स्तर -१४ (३८६०० -१२२८०० ) मध्ये समावेश झाल्याचे म्हटले आहे.

Police PSI
Britain Police : पोलिसांची थेट देशाच्या पंतप्रधानांवरच मोठी कारवाई; कारण जाणून तुम्हीही सावध व्हाल!

नांदेडसह अन्य जिल्ह्यात वरील वेतनश्रेणी निश्चित होऊन तसा लाभ मंजूर करण्यात आला आहे. मात्र, नाशिकमधील श्रेणी उपनिरीक्षकांना मेट्रिक वेतनस्तर-१० नुसार मिळणाऱ्या पूर्वीच्याच वेतनावर समाधान मानावे लागत आहे. कामाचा ताण वाढला असतानाच पूर्वीच्याच पगारावर भागवावे लागत असल्याने बढती प्राप्त ग्रेड पीएसआयमध्ये नाराजी आहे.

Police PSI
Police Vehicle : शासनाच्या वाहनांकडूनच वाहन क्रमांकाच्या नियमांना हरताळ

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.