Recruitment : दिंडोरी तालुक्याताल रिक्त ५३ पोलिसपाटीलपद भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. या भरतीसाठी आरक्षणाची सोडत २१ सप्टेंबरला सकाळी दहाला दिंडोरी तहसील कार्यालयात होणार आहे. (Police Patil recruitment will be held in Dindori taluka Leaving reservation at Tehsil office on September 21 nashik)
दिंडोरी तालुक्यात पोलिसपाटील संवर्गातील एकूण १४८ मंजूर पदे आहेत. यापैकी ९५ पोलिसपाटलांचे पदे कार्यरत असून, एकूण रिक्त ५३ पदे भरण्याचे निश्चित केले आहे.
याबाबत विभागीय आयुक्त कार्यालयाने निश्चित करून दिलेल्या बिंदूनामावलीतील आरक्षणानुसार दिंडोरी तालुक्यातील पेसा क्षेत्रातंर्गत असलेली ४६ पोलिसपाटील संवर्गातील रिक्त पदे, तर पेसा क्षेत्राबाहेरील रिक्त ७ गावांमध्ये पोलिसपाटलांची पदे भरण्यात येणार आहेत.
यात ० ते ५० टक्के अनुसूचित क्षेत्रात एकूण ११ पदे, ५० ते १०० टक्के अनुसूचित क्षेत्रात ३५ पदे तर अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकूण ७ पदे भरण्यात येणार आहेत. अनुसूचित क्षेत्रातील सर्व ४६ पदे अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत.
अनुसूचित क्षेत्राबाहेरील ७ पदांपैकी २ पदे अनुसूचित जमाती, १ पद विमुक्त जाती, १ इतर मागासवर्ग, १ आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग, तर २ सर्वसाधारण (खुला) वर्गासाठी राखीव आहेत.
आरक्षण प्रक्रिया ग्रामस्थांना माहिती होण्यासाठी त्या-त्या कार्यक्षेत्रातील तलाठी व ग्रामसेवकांना गावनिहाय जाहीर प्रगटन प्रसिध्दीसाठी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे यांनी पत्रान्वये कळविले आहे.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
तसेच २१ सप्टेंबरला सकाळी अकराला तहसील कार्यालयात संबंधीत गावातील नागरिकांनी आरक्षण सोडतीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन तहसीलदार पंकज पवार यांनी केले आहे.
पेसा क्षेत्रातील एकूण ४६ गावे
निळवंडी, खतवड, गवळवाडी, जानोरी, पिंपळगाव केतकी, आंबे दिंडोरी, गणेशगाव, कुर्णोली, कोल्हाटे, धामणवाडी, संगमनेर, माळेदुमाला, पिंप्रीअंचला, चंडीकापूर, गोलदरी, पांडाणे, फोफळवाडे, जुने धागूर, देहरेवाडी, उमराळे खुर्द, वाघाड, नवे धागूर, तिल्होळी, विळवंडी, पिंगळवाडी, खेडले,
वागदेवपाडा, माळेगाव (काजी), करंजाळी, टिटवे, वांजुळे, लोखंडेवाडी, साद्राळे, जालखेड, निगडोळ, वारे, तळयाचापाडा, मोखनळ, देवपूर, भनवड, बोरवण, वनारे, महाजे, ठेपणवाडी, नळवाडपाडा, नळवाडी, पेसा क्षेत्रा बाहेरील एकूण ७ गावे- अक्राळे, लखमापूर, बनारवाडी, सोनजांब, मातेरेवाडी, परमोरी, जोपूळ.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.