Nashik Crime: सेवन हॉर्स हॉटेलवर पोलिसांचा छापा; अवैधरीत्या हुक्का पार्लर प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल

 hookah parlor
hookah parloresakal
Updated on

Nashik Crime : छत्रपती संभाजीनगर रोडवरील (औरंगाबाद रोड) सेवन हॉर्स हॉटेलवर आडगाव पोलिसांनी छापा टाकून अवैधरीत्या सुरू असलेल्या हुक्का पार्लरचा अड्डा उद्‌ध्वस्त केला.

पोलिसांनी प्रतिबंधित सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांसह साहित्य जप्त करीत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, या घटनेमुळे शहरात अजूनही अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. (Police raid Seven Horse Hotel case filed against three people in case of illegal hookah parlor Nashik Crime)

छत्रपती संभाजीनगर रोडवर वैष्णवी गार्डन लॉन्स आहे. जवळच सेवन हॉर्स हॉटेल असून, या ठिकाणी अवैधरीत्या हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती आडगाव पोलिसांना मिळाली होती.

त्यानुसार आडगाव पोलिसाच्या गुन्हे शोध पथकाने सापळा रचून सोमवारी (ता. २४) रात्री साडेअकराच्या सुमारास सेवन हॉस हॉटेलवर छापा टाकला असता, त्या वेळी हॉटेलमध्ये अवैधरीत्या प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा वापर करून हुक्का पार्लर चालविला जात असल्याचे निदर्शनास आले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 hookah parlor
Jalgaon Crime News : काम सोडून गेलेल्या कामगारानेच फोडले गुदाम; सव्वालाखांचा माल लंपास

पोलिसांच्या पथकाने सिव्ल्हर फॉइल लावलेले तीन हुक्का पॉट व प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचे फ्लेव्हर, असा पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

तसेच, संशयित भूषण जगन्नाथ देवरे (वय ३१, रा. अमित सोसायटी, पाथर्डी फाटा), रिबुल अहमद बोनोबोईयान (१९, रा. सेवन हॅार्स हॉटेल, मूळ रा. नोगाव, डाकीन, डेब्रोस्तान, आसाम), कृष्णा हिरामण पेखळे (२७, रा. माडसांगवी, ता. नाशिक) यांच्याविरोधात आडगाव पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, हवालदार ढापसे तपास करीत आहेत.

 hookah parlor
Jalgaon Crime News : बॅरेकमधील कैद्यावर सामूहिक अत्याचार; नकार दिल्याने गळा कापण्याचा प्रयत्न

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.