Police Recruitment : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा लांबणीवर; पुण्यातील चाचणी लांबल्याने राज्यभर फटका

police recruitment
police recruitmentesakal
Updated on

नाशिक : पोलिस भरतीसाठीची लेखी परीक्षा लांबणीवर पडली आहे. पुणे येथे भरतीसाठी सुरू असलेली मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेर थांबविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातील भरतीसाठी मैदानी चाचणी पार करून लेखीसाठी पात्र ठरलेल्यांना आणखी काही आठवडे प्रतीक्षा करावी लागणार आहे.

दरम्यान, नाशिक जिल्हा ग्रामीण पोलिस भरतीसाठीच्या लेखी परीक्षेसाठी एक हजार ८६१ उमेदवार पात्र ठरले आहेत. लेखी परीक्षा लांबणीवर पडल्याने या उमेदवारांना परीक्षेची तयारी करण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. (Police Recruitment Written Exam for Police Recruitment Postponed Due to delay of test in Pune whole state affected nashik news)

नाशिक ग्रामीणच्या १६४ रिक्त शिपाई पदासाठी २ ते २० जानेवारीदरम्यान, आडगाव येथील मुख्यालयाच्या मैदानावर शारीरिक चाचणी घेण्यात आली होती. या मैदानी चाचण्यांचे निकाल प्रसिद्ध झाल्यावर उमेदवारांचे सामाजिक, समांतर आरक्षण व त्यांना मिळालेल्या गुणांची नोंद पोलिसांनी केली.

काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यावर पडताळणी करून सदर दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यासंदर्भात ग्रामीण अधीक्षक कार्यालयाने ३० जानेवारी व १० फेब्रुवारीला ई-स्वरूपात अहवाल प्रसिद्ध केले आहेत. त्यानुसार मैदानी चाचणीत ज्या उमेदवारांनी किमान ५० टक्के गुण मिळवले आहेत.

हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?

police recruitment
Shiv Janmotsav 2023 : निश्चयाचा महामेरु...बहुत जनांसी आधारु! नाशिकरोडला शिवजन्मोत्सव उत्साहात

या उमेदवारांतून एका रिक्त पदासाठी दहा उमेदवार, यानुसार लेखी परीक्षेसाठी गुणवत्तायादी तयार करण्यात आली. त्यानुसार अंतिम लेखी परीक्षेसाठी एक हजार ८६१ उमेदवार पात्र ठरले आहेत. मात्र, राज्यभरात एकाच दिवशी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे.

बृहन्मुंबई, पुणे व इतर ठिकाणी अद्यापही उमेदवारांची मैदानी चाचणी सुरू आहे. निवडणुकांमुळे पुणे येथील मैदानी चाचणी फेब्रुवारीअखेरपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. त्यामुळे पुणे व बृहन्मुंबईतील मैदानी चाचणीचे निकाल जाहीर झाल्यावर लेखी परीक्षा होईल. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी महिनाभर लांबण्याची शक्यता आहे.

police recruitment
Nashik News : शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत स्वाभिमानी महाराष्ट्रभर 22 फेब्रुवारीला रस्त्यावर उतरणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.