नाशिक : भद्रकाली परिसरात दीडशे वर्षांपूर्वीचा कुंटणखाना सील

Brothel in bhadrakali area
Brothel in bhadrakali areaSakal
Updated on

जुने नाशिक : भद्रकाली ठाकरे गल्ली परिसरातील दीडशे वर्षे पूर्वीचा कुंटणखाना भद्रकाली पोलिसांकडून सील करण्यात आला आहे. यावेळी कुंटणखान्यावर महिलांनी अंगावर रॉकेल ओतुन आत्महत्या करण्याची धमकी दिली. पोलिसांनी त्यांची समजूत काढल्याने अनर्थ टळला. (Police seal 150-year-old Brothel in Bhadrakali area)

काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त दीपक पांडे (Deepak Panday) यांनी शहरातील विविध भागातील धार्मिक स्थळ, शाळा, बाजारपेठ यांच्या दोनशे मीटर अंतरात सुरू असलेल्या कुंटणखाण्याची माहिती संबंधित पोलिस ठाण्याकडून मागण्यात आली होती. भद्रकाली परिसरातील ठाकरेगल्ली भागात दोन विविध ठिकाणी अनेक घरांमध्ये बेकायदेशीररित्या गेल्या दीडशे वर्षांपासून कुंटणखाना सुरू असल्याची माहिती भद्रकाली पोलिसांकडून पोलीस आयुक्तांना पाठवण्यात आली. आयुक्तांनी संबंधित कुंटणखाना चालकांवर कारवाई करण्याचे भद्रकाली पोलिसांना आदेशित केले होते. पोलीस ठाणेमार्फत सात दिवसांपूर्वी कुंटणखाना चालकाना नोटीस पाठवून कुंटणखाना बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. तसेच येथील देहविक्री करणाऱ्या महिलांना येथून स्थलांतरित होण्यास सांगितले होते.

Brothel in bhadrakali area
CDS बिपीन रावत यांच्या वृत्ताने नाशिक कॅम्पमध्ये शोककळा

पोलिसांनी नोटीस देऊन देखील कुंटणखाना बंद करण्यात आला नाही. गुरुवार(ता.९) दुपारच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता पवार, पोलीस निरीक्षक दीपक ठाकूर यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी, प्रणिता पवार, पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र माळी तसेच महिला व पुरुष पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुंटणखान्यातील महिलांना बाहेर पडण्यासाठी काही वेळ दिला. त्यांनी काही वेळ विरोध करत येथून कुठे जाणार कुठलीही व्यवस्था नाही. असे म्हणत स्थलांतर होण्यास नकार दिला. महिला अधिकारी कर्मचाऱ्यांनी त्यांची समजूत काढत त्यांना बाहेर काढले. त्यानंतर संपूर्ण कुंटणखान्यातील रूममधील तपासणी करत लहान मुले किंवा महिला आत राहिले नाही ना याची खात्री केली. शासकीय पंच यांच्या उपस्थितीत ठाकरे गल्ली येथील दर्शनी भागातील तसेच संदर्भ रुग्णालयाच्या मागील भिंतीस लागून असलेल्या कुंटणखान्यावर कारवाई करत सील करण्यात आले. त्यानंतर महिलांकडून सिल तोडता कामा नये. यासाठी बाहेरून पत्रे लावून तसेच वेल्डिंग करून कायमस्वरूपी कुंटणखाना सील करण्यात आला. दर्शनी भागातील कुंटणखान्यात चालकांनी न्यायालयाची स्थगिती असल्याचे कागदपत्र पोलिसांसमोर सादर केले. संबंधित कागदपत्र वेगळे असल्याने पोलिसांनी त्यांची कारवाई सुरू ठेवली. परिसरातील या महिलांना वारंवार त्रास देणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून कारवाई झाल्याचा आरोप महिलांनी केला. त्याच्याविरुद्ध परिसरात घोषणाबाजी करत शिवीगाळ केली. पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांनी महिलांना तेथून काढून दिले. दरम्यान काही महिलांनी आम्हास कोणी नाही. कुठे जायचे. अशी याचना करत अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या करण्याची धमकी दिली.

Brothel in bhadrakali area
नाशिक : भाजपच्या आयटी पार्कला केंद्र सरकारचा बूस्ट

व्यवसायिकांमध्ये समाधान

दीडशे वर्षापासून याठिकाणी कुंटणखाना चालत असल्याने शहराच्या विविध भागातील आंबट शौकिन, गुन्हेगारी प्रवृत्तीची व्यक्ती याठिकाणी येत होते. त्यामुळे विविध प्रकारच्या गुन्हेगारी संबंधित घटना, मारहाण, चोरी असे प्रकार घडत असल्याने येथील व्यवसायांवर त्याचा परिणाम होत होता. गेल्या अनेक वर्षापासून त्यांच्याकडून कुंटणखाना बंद करण्याची मागणी केली जात होती. गुरुवारी प्रत्यक्षात कुंटणखाना सील करण्यात आल्याने त्यांच्याकडून समाधान व्यक्त करण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.