High Alert in State: राज्यात पोलिस, गोपनीय यंत्रणा सतर्क! देशविघातक कृत्य घडवून आणण्याची शक्यता

High-Alert
High-Alertesakal
Updated on

High Alert in State : देशविदेशात घातपाताच्या कारवाया करणाऱ्या दहशतवादी संघटनांकडून आगामी काळातील सण-उत्सवादरम्यान देशविघातक कृत्य घडवून आणण्याची शक्यता आहे. गुप्तचर विभागाने त्यासंदर्भात महाराष्ट्र पोलिस दलास अतिदक्षतेसह सतर्कतेचा इशारा दिला आहे.

त्यापार्श्वभूमीवर राज्यभरातील पोलिस व गोपनीय यंत्रणा सतर्क झाल्या असून, संवेदनशील शहरातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Police secret system high alert in state Possibility of committing anti national act nashik news)

काही महिन्यांमध्ये राज्यातच नव्हे, तर देशभरात गुप्तचर संस्थेने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील दहशतवादविरोधी पथकांनी ठिकठिकाणी छापे टाकून दहशतवादी कृत्य करण्याच्या तयारीत असलेल्या पीएफआय (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया) या संघटनेच्या १०६ संशयित पदाधिकाऱ्यांना छापे टाकून अटक केली होती,

तर काही राज्यांत इंडियन मुजाहिद्दीन, लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असलेल्यांनाही अटक करण्यात आली आहे.

असे असले तरी, पीएफआय, इसीस, इंडियन मुजाहिद्दीन, अल-कायदा, लष्कर ए तोयबा, हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनांकडून राज्यात व देशात आगामी काळात दहशतवादी कृत्य घडवून आणण्याची शक्यता नाकारता येत नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

High-Alert
Nashik ZP News: 2 दिवस शिल्लक असताना जि. प. चा लागेना ताळमेळ! आगामी नियोजन लांबणीवर पडण्याची शक्यता

राज्यात आगामी काळात महत्त्वाचे सण-उत्सव आहेत. त्यामुळे या काळात दहशतवादी संघटनांकडून राजकीय व्यक्ती, पोलिस, सुरक्षा यंत्रणा, गर्दीची ठिकाणे आदींना लक्ष्य करण्याची शक्यता असून, यातून धार्मिक दंगल घडवून राज्यात अशांतता व कायदा सुव्यवस्था बिघडविण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्या पार्श्वभूमीवर गुप्तचर विभागाकडून पोलिस यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे समजते. त्यानुसार पोलिस यंत्रणेकडूनही राज्यातील संवेदनशील शहरांतील राजकीय, सामाजिक व धार्मिक घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.

जेणेकरून कोणतीही अप्रिय घटना घडणार नाही, यासाठी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तही वाढविण्यात आला आहे.

High-Alert
Nashik: ड्यूटी त्र्यंबकेश्वरची ओढ मात्र नाशिकची! त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शिक्षकांचे शिकविण्याकडे दुर्लक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.