धक्कादायक! बायकोच्या चारित्र्यावर संशय...नवऱ्यानेच मारण्याची दिली सुपारी..अन् मग

murder.jpg
murder.jpg
Updated on

नाशिक : राहुड (ता.चांदवड) बायको वारंवार सांगून देखील परपुरुषासोबत अनैतिक संबंध ठेवते या संशयावरुन नवऱ्यानेच बायकोला संपवण्याची सुपारी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राग इतका गेला विकोपाला की बायकोला संपवण्याचे मोठे षड्यंत्रच रचले असल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे...सविस्तर प्रकार असा की...

असा आहे प्रकार

मंगळवारी राहुड शिवारात मुंबई-आग्रा हायवे लगत मैल स्टोन 348/8 लगत असलेल्या नाल्यात एका अनोळखी महिलेचा मृतदेह सापडल्याने पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा व चांदवड पोलिसांनी अवघ्या तीनच दिवसात या प्रकरणाचा तपास करत महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडण्यात यश मिळविले. मयत महिला नीता नारायण चित्ते (वय 49, रा. चित्ते प्लाझा, प्लॉट नंबर 01, गजपंथ म्हसरूळ, नाशिक) या महिलेस पती नारायण शामराव चित्ते याने पत्नी निता हिचे इतर पुरुषांशी वारंवार अनैतिक संबंध ठेवते म्हणून तिच्या अशा वागण्याने नारायण चित्ते हा त्रासून गेला होता. तिला त्याने वेळोवेळी समजावून सांगूनही तिच्या वर्तनात फरक पडत नव्हता. त्याचा राग मनात धरून नारायण चित्ते यांनी त्याचा जवळचा मित्र विनय निंबाजी वाघ (वय 52, गुलमोहर नगर म्हसरूळ) यांच्या मदतीने भरत देवचंद मोची उर्फ मोरे (28, रा. भीमनगर, उल्हासनगर ) यास निता हिस जीवे ठार मारण्यासाठी दहा लाख रुपयांची सुपारी दिली. 

अशी घडली घटना

मयत नीता ही रविवारी (ता. 14) सकाळी पती नारायण चित्ते यास सांगून उत्तम नगर सिडको येथे माहेरी गेली होती. आरोपी भरत देवचंद मोरे यांनी त्याचा साथीदार वाहिद अली शराफत अली (रा. पंचशील नगर, उल्हासनगर) यांचेसह मयत महिला नीता हिस व्हाट्सअपवरून चॅटिंग करत विश्वासाने आडगाव नाक्यावरील उड्डाणपुलाजवळ बोलविले. मयत नीता हिने माहेरी आई-वडिलांना गुजरातला जाते असे सांगितले. आरोपी भरत मोरे याने मयत नीता हिला नाशिक येथून स्विफ्ट कार ( क्र. एम एच 01, पी ए 5632)मध्ये बसविले व मुंबई-आग्रा महामार्गवर चांदवड लगत राहुड घाट परिसरात साडीने गळा आवळून जीवे ठार केले व पुरावा नष्ट करण्यासाठी मयत नीताचे प्रेत महामार्गालगतच्या नाल्यात फेकून दिले. दुसऱ्या दिवशी सकाळी विनय वाघ यांचेकडून विलहोळी येथे पाच लाख रुपये घेतले व उर्वरित रक्कम नंतर घेऊन येण्यास सांगितले. विनय वाघ यास म्हसरूळ परिसरातून अटक करण्यात आली आहे.

पती नारायण चित्ते याने पत्नी हरवल्याची तक्रार अंबड पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी संशयित पती नारायण शामराव चित्ते, विनायक निंबाजी वाघ, (रा. नगर नाशिक) या दोघांना ताब्यात घेतली आहे. तर भरत देवचंद मोची (रा. उल्हासनगर, शहाड) व चौथा संशयित साक्षीदार वाहिद अली शराफत अली या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. नारायण चित्ते, विनायक वाघ यांना न्यायालयात हजर केले असता दोघांना 30 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. तिसरा संशयित भरत देवचंद मोची उर्फ मोरे यास शनिवारी अटक केली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंह, मालेगाव अप्पर पोलीस अधीक्षक संदीप घुगे व मनमाड विभाग पोलीस अधीक्षक समीर साळवे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील अधिक तपास करीत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.