Nashik : अवैध हातभट्यांवर पोलिसांकडून धडक कारवाई

Police Taking Action
Police Taking Actionesakal
Updated on

अंबासन (जि. नाशिक) : बागलाण तालुक्यातील पारनेर येथील करंजाडी नदीकाठावरील झाडाझुडपात सुरू असलेल्या बिनबोभाट अवैध हातभट्यांवर (illegal kilns) जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई करीत रसायन जागीच नष्ट केले. दरम्यान एका हातभट्टीवरील सोळा हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला असून संबंधित हातभट्टी चालविणारा पोलिसांचा सुगावा लागताच फरार झाला आहे. (Police take action on illegal liquor makers Nashik Crime News)

करंजाडी नदीकाठावर गेल्या अनेक महिन्यांपासून बिनबोभाट अवैध हातभट्ट्या सुरू होत्या या हातभट्यांमुळे तरूण वर्ग गावठी दारूच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होऊ लागली होती तसेच अनेकांचे संसार दारूमुळे उद्ध्वस्त होत चालले आहेत. जायखेडा पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकृष्ण पारधी यांना गुप्त माहिती मिळताच हवालदार शरद भगरे, सचिन पवार, होमगार्ड हितेश भामरे, यांना कार्यवाहीबाबत मार्गदर्शन केले. पथकासह पारनेर येथील पोलीस पाटिल महेश देवरे, सरपंच प्रशांत देवरे, निलेश कापडणीस, मांगू देवरे, प्रतिक देवरे, देवीदास देवरे कंरजाडी नदीकाठावरील बिनबोभाट सुरू असलेल्या अवैध हातभट्यांवर दबक्या पावलांनी जाऊन काटेरी झुडपात दडवून ठेवलेले गावठी दारूसाठी रसायन जागीच नष्ट करून सुरू असलेल्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. काटेरी झुडपात एका ठिकाणी अनिल नानाजी बोरसे यास पोलिसांचा सुगावा लागताच हातभट्टी सोडून पोबारा केला. पोलिसांनी बोरस

विरोधात गुन्हा दाखल केला असून सोळा हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून बिनबोभाट अवैध हातभट्ट्या सुरू होत्या जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई केल्यामुळे परिसरातून पोलिसांचे अभिनंदन केले जात आहे.

Police Taking Action
भेळभत्त्यासोबत कांदा मिळतो मुबलक; अल्प दरामुळे व्यावसायिकांना फायदा

"पोलिस ठाण्यात पारनेर परिसरात अवैध हातभट्यांबाबत माहिती मिळताच हातभट्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुप्त माहितीनुसार अवैध हातभट्यांवर कारवाई सुरूच राहील."

- श्रीकृष्ण पारधी, सहाय्यक पोलीस निरीक्षक जायखेडा.

"वरिष्ठांकडून अवैध हातभट्यांवर कारवाई करण्यासाठी मार्गदर्शन मिळाले त्यानुसार करंजाडी नदीकाठावरील झाडाझुडपात बिनबोभाट अवैध हातभट्यांवर धडक कारवाई केली."

- शरद भगरे, हवालदार जायखेडा

"गावात सहजच गावठी दारू मिळत असल्याने तरूण वर्ग व्यसनाधीन होत चालले होते. यामुळेच गावाची शांतता भंग होऊ नये यासाठी जायखेडा पोलिसांनी हातभट्टीवरील केलेली कारवाई अभिनंदनीय आहे." - महेश देवरे, पोलीस पाटिल, पारनेर

Police Taking Action
आझादी का अमृत महोत्सव; NMC ची कचरा व्यवस्थापन व जनजागृती मोहीम

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()