Nashik : सफरिंग प्रमाणपत्रासाठी पोलीस ते सिविल रॅकेट उघड

Civil Hospital & police
Civil Hospital & policeesakal
Updated on

नाशिक : पोलिस कर्मचाऱ्यांना आंतरजिल्हा बदल्यांसाठी सफरींग म्हणजेच घरातील कोणी व्यक्ती आजारी असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते. यासाठी काही पोलिसांनी जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताशी धरून बनावट प्रमाणपत्र तयार करून ते अधीक्षकांना सादर केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

या प्रकरणात आतापर्यंत ग्रामीण पोलिस मुख्यालयातील महिला वरिष्ठ लिपिक आणि जिल्हा रुग्णालयातील चतुर्थ श्रेणीचा कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली आहे. संगममतातून अर्थकारण चालणाऱ्या या प्रकरणात वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सहभाग असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे या प्रकरणातून मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता आहे. (Police to Civil Racket Exposed for Suffering Certificate Nashik Latest Marathi News)

याप्रकरणी ऑगस्ट महिन्यात नाशिक तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून ग्रामीण पोलिस मुख्यालयातील वरिष्ठ लिपिकासह इतरांविरोधात गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी तपास करून ग्रामीण मुख्यालयातील वरिष्ठ लिपिक हिरा रवींद्र कनोज यांना गेल्या ७ तारखेला अटक केली असून त्यांना १२ सप्टेंबरला न्यायालयीन कोठडी सुनावली.

सोमवारी (ता. १२) जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन कांतीलाल रामभाऊ गांगुर्डे (रा. गोवर्धन) यांना तालुका पोलिसांनी याचप्रकरणी अटक केली आहे. गांगुर्डे यांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण

पोलिस निरीक्षक खगेंद्र टेंभेकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, वरिष्ठ लिपिक कनोज यांच्याकडे आंतरजिल्हा बदल्यांची जबाबदारी सोपवली होती. त्यानुसार बदलीसाठी पोलिसांनी त्यांचे नातलग आजारी असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सोबत जोडले होते. मात्र हे प्रमाणपत्र काळजीपूर्वक न पाहता कनोज यांनी अर्जांमध्ये खाडाखोड केली व वरिष्ठांकडे सादर केली.

Civil Hospital & police
PAN Card अपडेटच्या नावाखाली भामट्याने केली 2 लाखांची फसवणूक

त्यामुळे या प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी केली असता नाशिक व धुळे जिल्हा शासकीय रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संगनमत करून नातलगांना कोणताही आजार नसताना प्रमाणपत्रावर स्वाक्षरी करून बनावट प्रमाणपत्र तयार करून दिले. त्यामुळे वरिष्ठ लिपिक, रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी, खासगी डॉक्टर व रुग्णालयांमधील कर्मचाऱ्यांनी संगनमत करून शासनाची फसवणूक केल्याचे टेंभेकर यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सुरुवातीस कनोज यांना अटक केली व प्रशासनाने त्यांना निलंबीत केले आहे. तर जिल्हा रुग्णालयातील लिफ्टमन गांगुर्डे यांना अटक केली आहे.

वैद्यकीय अधिकारीवर कारवाई?

या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाला ग्रामीण अधिकारी नोटीस बजावली होती जिल्हा अध्यक्ष डॉक्टर अशोक थोरात यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून अहवाल मागितला होता त्यानुसार त्यात काही संशयास्पद बाबी निदर्शनास आल्याचे समजते दरम्यान या प्रकरणी काही वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहे त्यांच्यवर येत्या काही दिवसात ग्रामीण पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता आहे

"शासन निर्णयानुसार आंतरजिल्हा बदलीसाठी काही अटी असून त्यापैकी शस्त्रक्रियेची एक अट आहे. अर्जांच्या छाननीत अर्जदारांनी बनावट अहवाल सादर केल्याचे समोर आले आहे. जिल्हा रुग्णालय प्रशासनाने केलेल्या तपासणीतही बनवेगिरी उघड झाला आहे."

- सचिन पाटील, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

Civil Hospital & police
Bribe Crime : निमगाव वाकडा केंद्रातील आरोग्य सेवकास लाच घेताना अटक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()