Police Training : अल्पसंख्याक समुदायातील युवक-युवतींसाठी छ. संभाजीनगरला निवासी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण

Police recruitment
Police recruitmentesakal
Updated on

Police Training : अल्पसंख्याक समुदायातील (मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, जैन, बौद्ध, शीख ) युवक व युवतींना प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्यात आश्वासक वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.

या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागामार्फत अल्पसंख्याक समुदायातील युवक- युवतींसाठी निवासी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. (Police Training For youths from minority communities Resident Police PreRecruitment Training to Sambhajinagar nashik news)

अल्पसंख्याक समुदायातील किमान १२ वी इयत्ता उत्तीर्ण युवक -युवतींना तीन महिन्यांच्या कालावधीचे पोलिस भरतीपूर्व निवासी प्रशिक्षण ‘प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेमार्फत’ देण्यात येणार आहे.

तीन महिन्याच्या प्रशिक्षण कालावधीत शारीरिक चाचणी, धावणे, गोळाफेक इत्यादींचे प्रशिक्षण उमेदवारांना देण्यात येईल. तसेच सामान्य ज्ञान, अंकगणित, चालू घडामोडी, बुद्धीमत्ता चाचणी आणि मराठी व्याकरण या लेखी परीक्षेतील विषयांचे मार्गदर्शन प्रशिक्षणार्थींना देण्यात येईल.

प्रशिक्षणात सहभागी होण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता: उमेदवाराने किमान इयत्ता १२ वी उत्तीर्ण केले असणे गरजेचे आहे. १८ वर्षे ते ३३ वर्षे या वयोगटातील उमेदवार या प्रशिक्षणासाठी अर्ज करू शकतात.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Police recruitment
Bank Recruitment : पाचोरा पीपल्समध्ये 5 महिन्यात नोकर भरती

त्याचप्रमाणे पुरुष उमेदवारांची उंची किमान १६५ से.मी. तर महिला उमेदवारासाठी किमान उंची १५५ से.मी. असणे गरजेचे आहे. मोफत प्रशिक्षणात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला (L.C.), एस.एस.सी., एच.एस.सी/पदवी (गुणपत्रक/प्रमाणपत्र), ३ पासपोर्ट साईज फोटोग्राफ्स, आधार कार्ड या कागदपत्रांच्या प्रत्येकी दोन छायांकित प्रतीसह पुढील पत्त्यावर अर्ज करावा अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी दिली.

अधिक माहितीसाठी उमेदवार ७७२२०७००५५ / ६६ या क्रमांकांवर संपर्क साधू शकतात. अर्ज करण्याचा अंतिम तारीख २५ मे असून प्रबोधन बहुउद्देशीय संस्था संचलित स्पेक्ट्रम ॲकॅडमी ,पहिला मजला, श्रीहरी साफल्य बिल्डिंग, महात्मा फुले चौक, औरंगपुरा, छत्रपती संभाजीनगर(औरंगाबाद) येथे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

Police recruitment
Police Recruitment : पोलिस भरतीत वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी लाच

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.