Nashik Accident News : दुचाकीवरून पडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यु

policeman died after falling from bike nashik accident news
policeman died after falling from bike nashik accident newsesakal
Updated on

Nashik Accident News : उपनगर पोलिस ठाण्यात नेमणुकीस असलेले बिटमार्शलचा दुचाकीवरून पडून दुर्दैवी मृत्यु झाल्याची घटना घडली. (policeman died after falling from bike nashik accident news)

बिटमार्शल पोलीस नाईक सचिन बाळासाहेब वाटाणे (४१, जुना सायखेडा रोड, नाशिकरोड) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.

वाटाणे हे गेल्या शनिवारी (ता. ८) सायंकाळी पिन्टो कॉलनीतून नारायण बापू नगरकडे दुचाकीवरून उपनगर पोलिस ठाण्यात जात होते. त्यावेळी ते धावत्या दुचाकीवरून अचानक पडल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

policeman died after falling from bike nashik accident news
Nashik Crime: एका व्यावसायिकांचा भर न्यायालयातच गोंधळ! सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल

त्यांना तात्काळ उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले असता, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी उपनगर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.

त्यांच्या मागे आई-वडील, बहिण, पत्नी, एक मुलगा, मुलगी असा परिवार आहे. दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे.

policeman died after falling from bike nashik accident news
Nashik Crime News : मांत्रिक महिलेच्या खून प्रकरणी संशयिताला 3 दिवस कोठडी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.