Shivsena: राऊतांच्या दौऱ्यादरम्यान राजकीय भुकंप! अख्खी नगरपंचायत शिंदे गटात; नाशिकमध्ये नेमकं काय घडलं?

संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना जिल्ह्यात ठाकरे गटला मोठा धक्का
Uddhav Thackrey
Uddhav Thackrey Esakal
Updated on

शिवसेनेत बंड झाल्यापासून ते आजपर्यंत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर काल मुंबईमध्ये ठाकरे गटाच्या दोन शिलेदारांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीकोनातुन राज्यातील राजकीय पक्षात मोठ्या हालचाली सुरू असल्याचे दिसुन येत आहे.(Latest Marathi News)

अशातच पक्ष बांधणीसाठी नेते प्रयत्न करत आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यात त्यांनी दौरे सुरू केले आहेत. काल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावर गेले होते. यावेळी नाशिकमध्येच ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे राऊत हे नाशिक दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातल्या सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश केला आहे.(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
Rahul Gandhi: विरोधी पक्षातील नेत्यांच्या बैठकीला काँग्रेसने दाखवली पाठ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाचे नेते भाऊ चौधरी यांनी ठाकरे गटाला जोरदार धक्का दिला आहे.

नाशिकमधील सुरगाणा नगरपंचायतीच्या नगराध्यक्षांसह सर्वच नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये या सर्व नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात प्रवेश करताना या नगरसेवकांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेत. संजय राऊत यांच्या वाचाळ वृत्तीस कंटाळून आम्ही ठाकरे गट सोडण्याचा निर्णय घेतल्याचं नगरसेवकांनी म्हटलं आहे.(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
Sharad Pawar: शरद पवार नाराज? राऊतांच्या थुंकण्याच्या कृतीवर मांडली भूमिका

शिंदे गटात गेलेले नगरसेवक

भारत वाघमारे- नगराध्यक्ष, सचिन आहेर- नगरसेवक (गटनेता), भगवान आहेर- नगरसेवक, पुष्पाताई वाघमारे - नगरसेविका, अरुणाताई वाघमारे - नगरसेविका, प्रमिलाताई वाघमारे - नगरसेविका, दिनेश वाघ - कार्यकर्ते, विलास गोसावी - कार्यकर्ते, चारोस्कर - कार्यकर्ते, गौरव सोनवणे - कार्यकर्ते(Latest Marathi News)

Uddhav Thackrey
lok sabha 2024: रिटायर शिंदे पुन्हा मैदानात! सोलापूर लोकसभेचे सर्वाधिकार सुशीलकुमार शिंदेंकडे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.