नाशिक : स्वच्छ भारत अभियानात क्रमांक घसरण्यामागे कारणीभूत ठरत असलेल्या डेब्रिज संकलित करून त्यातून त्यावर पेव्हर ब्लॉक तयार करण्याचा प्रकल्प अडचणीत आणण्याचे राजकीय उद्योग पेव्हर ब्लॉक ठेकेदारांकडून सुरू आहेत.
महापालिकेने पेव्हर ब्लॉक तयार केल्यास त्यांच्या मालाला उठाव मिळणार नाही व आपसूक धंदे बंद होऊन टाळे लावण्याची वेळ येईल, अशी युक्ती त्यामागे असल्याचे बोलले जात आहे. (Political industry of putting paver block project in trouble by contractors nashik Latest marathi news)
शहरातील जुन्या इमारती, वाड्यांचा मलबा व टाकाऊ बांधकाम साहित्य मोठ्या प्रमाणात बाहेर पडते. या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने स्वतंत्र प्रकल्प उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी पाथर्डी येथील सर्व्हे क्रमांक २७९/१/२ या जागेवर प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेतला होता.
परंतु, भूसंपादन न झाल्याने नगर नियोजन विभागाने मखमलाबाद शिवारातील सर्व्हे क्रमांक ३२३/२/२ येथे पर्यायी जागा सुचवली होती. मात्र, या जागेला विरोध होऊन चार ते पाच लोकांनी आंदोलन केले. मखमलाबाद येथील प्रस्तावित प्रकल्प वादग्रस्त ठरत असल्याने सदरचा ठराव विखंडित करण्यासाठी शासनाकडे पाठविला जाणार आहे.
मात्र, यापूर्वी पाथर्डी येथे बांधकाम साहित्य संकलित करून त्या साहित्याची विल्हेवाट लावण्यासाठी पेव्हर ब्लॉक प्रकल्प उभारला जाणार होता. परंतु, राजकीय दबाव आणून सदरचा प्रकल्प गुंडाळण्यात प्रशासनाला भाग पाडण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
म्हणून प्रकल्पाला विरोध
नियमात नसले तरी महापालिका पेव्हर ब्लॉकची सर्वात मोठी खरेदीदार आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला, जॉगिंग ट्रॅक, फुटपाथ, उद्याने एवढेच काय पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठीदेखील पेव्हर ब्लॉक उपयोगात आणले जातात.
त्यामुळे बांधकाम साहित्याच्या मलब्यातून पेव्हर ब्लॉक तयार करून उपलब्ध साहित्याचे नैसर्गिकरित्या विल्हेवाट लावण्याबरोबरच महापालिकेला उत्पन्नाचे एक चांगले साधन उपलब्ध होईल या उद्देशाने खत प्रकल्पाच्या धर्तीवर पेव्हर ब्लॉक प्रकल्प उभारण्याचे नियोजन होते.
परंतु, महापालिकेने प्रकल्प उभारल्यास शहराच्या आजूबाजूला असलेले खासगी कारखाने बंद पडून ताळे लावण्याची वेळ येईल, या भीतीने राजकीय दबाव आणून प्रस्तावित प्रकल्पाचा प्रस्ताव कागदावर आणून देण्याची किमया साधण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.