Nashik MD Drugs Case : ‘ड्रग्ज’ची पाळेमुळे समूळ नष्ट करण्याची गरज; राजकीय प्रतिनिधींची हाक

Drugs
Drugsesakal
Updated on

Nashik MD Drugs Case : करोडोंचे एमडी ड्रग्ज अर्थातच अमलीपदार्थ सापडल्यानंतर महाराष्ट्राच्या नकाशावर नाशिक तालुक्यातले ग्रामीण परिसर असणारे शिंदे हे उद्योगनगरीचे गाव लाल अक्षरांनी चकाकून दिसत आहे.

देवळाली मतदारसंघात हे गाव येत असल्याने ग्रामीण भागात असे अवैध व्यवसाय कोणाच्या मर्जीने सुरू होते, या संदर्भात तर्कवितर्क लढविले जात आहे. (political representatives statement about need to eradicate drug addiction nashik news)

यासाठी पोलिस प्रशासनासह शासनाचे विविध विभाग तसेच ग्रामस्थांसह सामान्य नागरिकांनी जागृत राहण्याची सामाजिक जबाबदारी व्यक्त करण्यात येत आहे. ‘ड्रग्ज’ची पाळेमुळे समूळ नष्ट करण्याची गरज असून, यासाठी पोलिस दलाने प्रबळ इच्छाशक्ती दाखविण्याची गरज आहे.

नशील्या पदार्थांच्या विळख्यात सध्या तरुणाई आपला जीव गमावत आहे. त्यातच ‘उडत्या पंजाब’ सारखी नशिली परिस्थिती नाशिकमधल्या अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. ड्रग्जचे कनेक्शन नुसते नाशिक नाही तर नाशिकमधून अख्खा महाराष्ट्रात पसरले आहे.

सध्या पोलिसांच्या हीट लिस्टवर असणारे अनेक कुख्यात लोक याचे सप्लायर आहेत. शिंदेमध्ये मुंबईच्या साकी नाका पोलिसांनी सील केलेली गणेशाय इंडस्ट्री कंपनी देवळाली मतदारसंघात येते. शिवाय या कंपनीला कोणत्याही प्रकारची औद्योगिक परवाना नव्हता. मग या कंपन्या कोणाच्या आशीर्वादाने सुरू होत्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

Drugs
Nashik MD Drug Case: शिंदे गावातील ‘ती’ कंपनीच बोगस

शिवाय ही कंपनी अनेक दिवसांपासून सुरू होती. पोलिस आणि औद्योगिक विभाग गप्प का होता, या संदर्भात लोकप्रतिनिधी विद्यमान आमदारांसह विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते लोकांच्या हिताची काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

कंपनी चालवणारा ललित पाटील हा पूर्वाश्रमीचा आरपीआय आणि नंतर शिवसेनेचा (ठाकरे गट) पक्षाचा पदाधिकारी होता. ड्रग तस्कर ललित पाटीलला पोलिसांबरोबरच कोणत्या राजकीय पक्षाच्या नेत्याचा आशीर्वाद होता, हे समोर यायला हवे अशी अपेक्षा सामान्य नागरिकांसह लोकप्रतिनिधी व्यक्त करीत आहे.

''उपमुख्यमंत्री अजित पवार यांना या गोष्टीची कल्पना मी दिलेली आहे. या संदर्भात गृहमंत्र्यांना लेखी निवेदन देऊन येणाऱ्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करणार आहे. पोलिसांच्या डोळ्याखाली या गोष्टी घडत आहे. युवा पिढी यामुळे बरबाद होत आहे. दोषींवर कारवाई व्हायला हवी यासाठी प्रयत्न करणार आहे.''- सरोज अहिरे आमदार.

Drugs
Nashik MD Drug Case : ड्रग्ज प्रकरणात सत्ताधारी भाजप आमदारांचाही सहभाग : नाना पटोले

''देवळाली मतदारसंघात अशा गोष्टी घडणे लाजिरवाणे आहे. शासनाने औद्योगिक वसाहतींमध्ये सर्च ऑपरेशन राबवायला हवे. पोलिस प्रशासनाने ही ड्रग विकणाऱ्या टोळीचा शाश्वत बंदोबस्त करायला पाहिजे. यामुळे देवळाली मतदारसंघाची बदनामी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून व्यसनविरोधी जनजागृतीची मोहीम राबवणार आहोत.''- लक्ष्मण मंडाले. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट).

''शिंदे येथील साडेतीनशे कोटीचा टोलनाका आहे आणि त्याच्या आसपासच सहाशे कोटीचा ड्रग्ज निर्मिती कारखाना सापडतो. ही गंभीर गोष्ट आहे. शासनाने खोलात जाऊन सत्य जनतेसमोर आणायला हवे. आजपर्यंत अर्धसत्य जनतेसमोर आले आहे.''- योगेश घोलप, माजी आमदार.

''सध्या नागरिकांनीच सजग राहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हा सर्व प्रकार कोणाच्या आशीर्वादाने सुरू होता, याची सखोल चौकशी होऊन जनतेसमोर सत्य यायला हवे. काही कुख्यात लोकांमुळे लोकांमुळे परिसराची बदनामी होते.''- तनुजा घोलप, विधानसभाप्रमुख, भाजप.

Drugs
Nashik MD Drug Case : जागा भाड्याने घेणारा ‘कांबळे’चा शोध; तपास गुन्हे शाखेकडे जाण्याची शक्यता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()