Nashik: मुंबई नाक्यावरील वाहतूक नियोजनाला राजकीय वळण! शिवसेना ठाकरे गटाचा सर्कलचा घेर कमी करण्यास विरोध

Former MLA Vasant Gite giving a statement to Municipal Commissioner Bhagyashree Banayat regarding Mumbai Naka Circle.
Former MLA Vasant Gite giving a statement to Municipal Commissioner Bhagyashree Banayat regarding Mumbai Naka Circle.esakal
Updated on

Nashik News : मुंबई नाका सर्कल व परिसरात वाहतूक ठप्प होत असल्याने रस्ता सुरक्षा समितीने सुचविलेल्या सर्कलचा घेर कमी करण्याच्या भूमिकेला शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने विरोध केला असून,

त्याऐवजी सर्व्हिस रोडला जोडणारे अंडरपास व बायपास तयार करण्याची मागणी माजी आमदार वसंत गिते यांनी केल्याने आता या भूमिकेला राजकीय वळण लागले असून, सत्तेत सहभागी असलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वीच फुले दांपत्याचा पुतळा उभारण्यासाठी घेर कमी करण्याची भूमिका घेतली आहे.

मुंबई नाका येथील सर्कल कमी करण्याच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार गिते यांनी महापालिकेच्या आयुक्त भाग्यश्री बानायत यांची भेट घेऊन भूमिका मांडली. माजी नगरसेवक प्रशांत दिवे या वेळी उपस्थित होते. (Political turn to traffic planning on Mumbai naka Shiv Sena Thackeray faction opposes reduction of circle size Nashik)

मुंबई नाका सर्कल परिसर वाहतुकीच्या दृष्टीने शहरातील सर्वांत मोठा ब्लॅक स्पॉट ठरला आहे. सायंकाळी सहा ते आठ, यादरम्यान सर्वाधिक वाहतूक ठप्प होत असल्याचा अहवाल रस्ता सुरक्षा समितीने नियुक्त केलेल्या रेडिएडंट या एजन्सीने सर्वेक्षणाअंती दिला.

त्यामुळे वाहतूक कमी करण्यासाठी मायलन सर्कलचा घेर कमी करण्याबरोबरच या भागात सरळ मार्गाने महामार्गाकडून येणाऱ्या वाहतुकीच्या नियोजनासाठी सिग्नल बसविण्याचे जवळपास निश्चित झाले आहे.

त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस व समता परिषदेच्या आंदोलनानंतर मायलन सर्कलच्या मधोमध महात्मा फुले दांपत्याचा पुतळा बसविला जाणार आहे. पुतळा तयार होण्यास वेळ लागणार असल्याने त्यापूर्वी सर्कलचा घेर कमी करण्याचे काम केले जाणार आहे.

परंतु सर्कलचा घेर कमी केल्यास वाहतुकीचा प्रश्न सुटण्याएवजी उलट वाढेल. सर्कलला वळसा घेण्याचा वेळ कमी होईल व त्यातून वाहतूक अधिक ठप्प होईल, असा दावा माजी आमदार गिते यांनी करताना त्याऐवजी पुणे व पिंपरी-चिंचवडच्या धर्तीवर अंडरपास व बायपासचे पर्याय सुचविले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Former MLA Vasant Gite giving a statement to Municipal Commissioner Bhagyashree Banayat regarding Mumbai Naka Circle.
Maharashtra Politics: राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नावासाठी जोरदार लॉबिंग, आता राष्ट्रवादीने ठोकला दावा

वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाय

- त्र्यंबक नाका ते मुंबई नाकादरम्यान स्मार्ट रस्त्याचा दुसरा टप्पा सुरू करावा

- रात्री चौक दंगल असलेल्या शासकीय कार्यालयाचे अतिक्रमण हटवून महामार्गाचे रुंदीकरण करावे

- किनारा हॉटेल, तसेच शिवाजी वाडी येथील पुलांची रुंदी वाढवावी

- सिडको, गोविंदनगर व इंदिरानगरकडील वाहतूक वळविण्यासाठी बायपास तयार करावा

- सर्व्हिस रोड जोडणारे अंडरपास तयार करावे

प्रस्तावित उड्डाणपुलाचा निधी वळवावा

मायको सर्कल व सिडकोतील त्रिमूर्ती चौकातील प्रस्तावित उड्डाणपूल रद्द करावा, पुलांसाठी अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आलेला निधी शहरातील अन्य विकासकामांसाठी खर्च करावा, तसेच अविकसित रस्ते, सिंहस्थपूर्वी काँक्रिटीकरण करणे, स्मार्ट सिटीने अशोक स्तंभ ते मुंबई नाका अपूर्ण सोडलेला रस्ता पूर्ण करावा, नद्यांवरील पुलांचे बांधकाम करावे, असे निवेदनात म्हटले आहे.

"मुंबई नाका परिसरात शहरातील अकरा रस्ते येऊन मिळतात. वाहतूक सुरळीत होण्यासाठी सर्कलचा घेर कमी करणे हा उपाय नाही, उलट वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार वाढतील. अंडरपास व बायपास हा त्यावर उपाय आहे." - वसंत गिते, माजी आमदार

Former MLA Vasant Gite giving a statement to Municipal Commissioner Bhagyashree Banayat regarding Mumbai Naka Circle.
Kolhapur Politics : शिवसेना, राष्ट्रवादीमधील फूट कुणाच्या पथ्यावर? 'या' नेत्यांची भूमिका ठरणार निर्णायक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.