NMC School : महापालिका शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे ढोलताशे, गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असले तरी शाळा इमारतींच्या दुरवस्थेने विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला.
महापालिकेच्या बांधकाम विभागाकडे शाळा दुरुस्तीचे प्रस्ताव आले, परंतु निधी नसल्याने दुरुस्ती झाली नसल्याचा दावा करण्यात आला. तर, शिक्षण विभागाने दुरुस्तीचे प्रस्ताव देवूनही कामे झाली नसल्याचा सुर लावला. (poor condition of NMC schools repair attracted attention of students nashik news)
शहरात रस्ते दुरुस्ती किंवा बांधकामविषयक अन्य कामे करायचे झाल्यास त्यासाठी तत्काळ निधी उपलब्ध होऊन कामाला सुरवातदेखील होते. पुढे ती कामे वादात सापडतात. परंतु विद्यार्थ्यांशी संबंधित असलेल्या विषयावर खर्च करण्यासाठी बांधकाम विभागाकडे निधी उपलब्ध नाही.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने छत गळती, प्लास्टर करणे, दारे व खिडक्या दुरुस्ती, इलेक्ट्रिकल स्वरूपाची कामे, ड्रेनेज दुरुस्ती, पाणी गळती, स्वच्छतागृह दुरुस्ती, फ्लोरींग रिपेरिंग, रंगकाम, संरक्षक भिंत दुरुस्ती, संरक्षक भिंत बांधणे व इतर दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे प्रस्ताव सादर केला.
परंतु निधी शिक्षण विभागाने त्यांना अंदाजपत्रकात मंजूर केलेला निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी करण्यात आली. गेल्या तीन महिन्यांपासून बांधकाम व शिक्षण विभागात टोलवाटोलवी सुरू आहे.
परंतु निधी प्राप्त झाला नाही. आता निधीची तरतूद केली तरी दुरुस्तीच्या कामाला सुरवात होण्यासाठी सहा महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक वर्षाचा श्रीगणेशा जीर्ण इमारतींच्या दर्शनानेच झाला.
"शिक्षण विभागाकडे तरतूद आहे. त्यानुसार बांधकाम विभागाकडून तीन महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे. अद्यापपर्यंत निधी मिळालेला नाही. निधी प्राप्त झाल्यास तत्काळ दुरुस्तीचे कामे हाती घेतले जातील." - शिवकुमार वंजारी, शहर अभियंता, महापालिका.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
असे आहेत दुरुस्तीचे प्रस्ताव
- छत गळती- ३७
- प्लास्टर करणे- ३६
- दारे व खिडक्या दुरुस्ती- ५३
- इलेक्ट्रिकल स्वरूपाची कामे- ४४
- ड्रेनेज दुरुस्ती- १३
- पाणी गळती- १९
- स्वच्छता गृह दुरुस्ती- ३६
- फ्लोरींग रिपेरिंग- ३९
- रंगकाम- ५८
- संरक्षक भिंत दुरुस्ती- १८
- संरक्षक भिंत बांधणे- ७
- इतर दुरुस्ती- ४१
दुरुस्तीसाठी विभागनिहाय प्रस्ताव (रुपये)
विभाग निधी
नाशिक रोड ३ कोटी
पूर्व एक कोटी ८३ लाख
सातपूर साडे तीन कोटी
पश्चिम एक कोटी ३१ लाख
पंचवटी एक कोटी ३७ लाख
सिडको पन्नास लाख
-----------------------------------------------
एकूण ११ कोटी ५३ लाख
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.