National Food Security Scheme
National Food Security Schemeesakal

Nashik News: गरिबांना आणखी वर्षभर मिळणार मोफत धान्य; राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी

Published on

नाशिक : केंद्र शासनाने राष्ट्रीय अन्य सुरक्षा योजनेंतर्गत अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना जानेवारी २०२३ पासून पुढील एका वर्षासाठी मोफत अन्नधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे गरिबांना आणकी वर्षभर मोफत धान्य मिळू शकेल.

नाशिक जिल्ह्यात ३६ लाख २२ हजार ११० इतक्या लाभार्थ्यांना या योजनेंतर्गत मोफत धान्य मिळेल, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसिंगीकर यांनी दिली. (poor will get free grain for another year Implementation of National Food Security Scheme Nashik News)

हेही वाचा : द मिसिंग टाइल सिंड्रोम ठेवा आपल्यापासून दूर

National Food Security Scheme
Nashik News : दक्षिणेत आढळले मातृपूजक संस्कृतीचे प्रतीकचिन्ह; नाशिकच्या अभ्यासकांचे यश!

जिल्ह्यात जानेवारी २०२३ मध्ये अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे एकूण सात लाख ९५ हजार ७८ शिधापत्रिकाधारक असून, त्यावर ३६ लाख २२ हजार ११० लाभार्थी आहेत. अन्न सुरक्षा योजनेंतर्गत सार्वजनिक वितरण व्यवस्थेमार्फत वितरित केल्या जाणाऱ्या अन्नधान्यांचा लाभ हे लाभार्थी घेत असून, त्यांना तीन रुपये प्रतिकिलो या दराने तांदूळ व दोन रुपये प्रतिकिलो या दराने गहू वितरित होतो.

कोरोनाकाळात मोफत दिले जाणारे अन्नधान्य डिसेंबर २०२२ पासून बंद करण्यात आले होते. आता या शिधापत्रिकाधारकांना राष्ट्रीय सुरक्षा अधिनियम अंतर्गत अंत्योदय योजना व प्रधान्य कुटुंब योजनेचे विकत मिळणारे धान्य १ जानेवारीपासून ३१ डिसेंबरपर्यंत (पूर्ण वर्षभर) मोफत दिले जाणार आहे.

त्यामुळे लाभार्थ्यांना रेशन दुकानातून धान्य घेताना दुकानदाराला त्यांना मिळणाऱ्या अन्नधान्याच्या बदल्यात पैसे देण्याची आवश्यकता नाही. राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमांतर्गत मोफत मिळणाऱ्या या धान्याबाबत लाभार्थ्यांनी रेशन दुकानदारकडून पावती मागून घ्यावी तसेच याबाबत कोणतीही तक्रार असल्यास त्यांनी संबंधित तहसील कार्यालयातील पुरवठा शाखेत अथवा जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन श्री. नरसिंगीकर यांनी केले आहे.

National Food Security Scheme
Breaking News | त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची बस पलटली; 13 भाविक जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()