नाशिक : सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीत रक्षाबंधनाच्या दिवशी सोमवारी (दि. 20) मानवतेला काळीमा फासणारी घटना घडली. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास एका पंचवीस वर्षीय तरुणाने ओळखीतल्या चार वर्षांच्या बालिकेला खाऊ घेऊन देण्याचे आमिष दाखवत तिचे अपहरण केले. या बालिकेसह संशयीताचा संपूर्ण रात्रभर पोलिसांकडून शोध घेण्यात येत होता. मंगळवारी सकाळी अपहरण झालेल्या बालिकेसह तो पोलिसांना मिळून आला. त्याने सदर बालिकेसोबत गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. पोस्को अंतर्गत त्याचे विरुद्ध वावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.