'जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी'

कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेले अभंग-भजन
कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेले अभंग-भजनesakal
Updated on

नाशिक : आध्यात्म व प्रबोधन हा समाज परिवर्तनाचा गाभा आहे. शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानने कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेल्या अभंग-भजन स्पर्धेमुळे बंदीजनांच्या मानसिकतेवर निश्चितच सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येईल, असा विश्वास कारागृह अधीक्षक प्रमोद वाघ यांनी व्यक्त केला.

शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवाचे निमित्त साधून कारागृहातील बंदीजनांसाठी जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नाशिक कारागृहातील बंदीजनांनी स्पर्धेत सहभाग नोंदवत ‘जात-पात ना धर्म रे माझ्या विठुराया पाशी’ या स्वरचित रचनेबरोबच संतरचना सादर केल्या. त्या वेळी वाघ बोलत होते.

वरीष्ठ तरुंग अधिकारी अशोक मालवाड, कारागृह गुरुजी हेमंत पोतदार, उद्योजक चंद्रकांत बोरसे, आनंद देवतरसे, शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि स्पर्धा प्रमुख लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड, हभप अच्युत महाराज कुलकर्णी, ज्ञानेश्वर शिंदे, विश्वस्त विवेक थिटे, संदीप राक्षे, संगीत मार्गदर्शक आनंद अत्रे, संदीप महाराज रायते, प्रतिष्ठानचे नाशिक विभाग प्रमुख किरण सानप, कार्याध्यक्ष प्रज्ञा तोरसकर-भोसले आदी उपस्थित होते.

कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेले अभंग-भजन
आषाढी वारी : निवृत्तीनाथांच्या पालखीचे पंढरीकडे प्रस्थान

समाधान आयुष्यभर टिकेल

स्पर्धेच्या निमित्ताने विठ्ठलाचे नामस्मरण केल्याने मनाला मोठी शांतता मिळाली आहे. नामस्मरणातून मिळालेले समाधान हे आयुष्यभर कायम राहील, असे इक्रम पठाण हा बंदी म्हणाला. कारागृहामध्ये संतांच्या नामाचे स्मरण हा बंदीजनांसाठी अविस्मरणीय योग आहे, असे भगवान सोळंकी म्हणाला. केशव पवार हा बंदी म्हणाला, या स्पर्धेच्या निमित्ताने कारागृहामध्ये सातत्याने भजनांचे कार्यक्रम होत आहेत. या आध्यात्मिक उपक्रमामुळे विठ्ठलाची भक्ती करण्याचा चांगला मार्ग आम्हाला मिळाला आहे.

विजेत्यांना महाकरंडक आणि प्रमाणपत्र

महाअंतिम फेरीत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या संघास ज्ञानोबा-तुकाराम महाकरंडक आणि प्रमाणपत्र, द्वितीय क्रमांकास राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाकरंडक आणि प्रमाणपत्र तर तृतीय क्रमांकास संत शेख महंमद महाकरंडक आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांना आणि स्पर्धक संघांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ संघांना साहित्यभेट

स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल कारागृहातील संघांला सौ. दिना आणि प्रकाश धारीवाल यांच्या वतीने स्व. सौ. कमलाबाई रसिकलाल धारीवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, 10 जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फेम व प्रबोधनात्मक तसेच प्रेरणायादी 82 पुस्तकांचा संच देण्यात आला.

"बंदीजनांसाठी विविध उपक्रम आयोजित करण्याची शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान संधी मिळावी. आतापर्यंत 15 कारागृहातील वातावरण पाहिल्यानंतर मनाला शांती देणारा, उर्जा देणारा हा उपक्रम असाच कायम चालू राहावा, अशी अपेक्षा आहे."

- लक्ष्मीकांत खाबिया, स्पर्धा प्रमुख

"जन्माला येताना कोणीही गुन्हेगार नसतो..अनावधाने किंवा क्रोधाने घडलेल्या घटनांमुळे जरी आज तुरुंगात असलो तरी पुढील काळात आपले आचार-विचार व मनपरिवर्तनासाठी आमच्या स्पर्धा उपयुक्त ठरतील."

-किरण सानप (नाशिक जिल्हाप्रमुख शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान)

कारागृहातील बंदीजनांसाठी आयोजित केलेले अभंग-भजन
राज्यात 12 ते 14 वयोगट कोरोना पहिला डोस लसीकरणात नाशिक अव्वल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()