Positive News : अतिगंभीर अवस्थेतील महिलेस ‘सिव्हिल’मध्ये जीवदान! वैद्यकीय पथकाची मेहनत

Saved Patient with Doctor
Saved Patient with Doctoresakal
Updated on

Positive News : अतिगंभीर परिस्थितीमध्ये जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या महिलेला जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकाच्या अथक मेहनतीमुळे जीवदान मिळाले. या महिलेस व्हायरल न्युमोनिया झाला होता.

त्यामुळे तिला व्हेटिंलेटर लावण्यात आलेले होते. अशा गंभीर स्थितीतून वैद्यकीय अधिकारी आणि स्टाफने केलेल्या उपचारांमुळे अखेर नऊ दिवसांनी रुग्ण महिलेला घरी सोडण्यात आले. (Positive News woman in critical condition saved in Civil hospital hard work of medical team nashik news)

रंजना इंद्रजित खरपडे (रा. जव्हार, जि. पालघर) असे या रुग्ण महिलेचे नाव आहे. रंजना यांना व्हायरल न्युमोनिया झाल्याने त्यावर गेल्या ९ तारखेपासून त्यांच्यावर जव्हार येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र प्रकृती दिवसेंदिवस खालावत गेली.

त्यामुळे अधिक उपचारासाठी तिला नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यासाठी नातलगांनी धाव घेतली. जिल्हा रुग्णालयात दाखल केले तेव्हाच या महिलेची प्रकृती चिंताजनक होती. तसेच तिला व्हेंटिलेटर सुरू होते.

सिव्हिलच्या अतिदक्षता विभागातील डॉ. प्रतिक भांगरे यांनी रंजना यांच्यावर करण्यात आलेल्या ट्रिटमेंट व तपासण्यांचे अहवाल पाहून त्यांच्यावर तात्काळ तातडीचे औषधोपचार सुरू केले. तसेच सुरवातीचे काही दिवस त्यांना व्हेंटिलेटर लावण्यात आले.

हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’

Saved Patient with Doctor
BJP News : सुनील मोरे यांचा भाजपात प्रवेश; मुंबईत पक्षप्रवेश सोहळा

गेल्या आठ-दहा दिवसात डॉ. भांगरे व विभागातील सिस्टर सीमा टाकळकर, दिवाण, स्टाफ लुसिया बोधक, स्टाफ नर्स शोभा देव, विजया सैंदाणे, अर्चना पाटील, किरण पाटील, उज्ज्वला शेळके, मिनल मिसाळ, मनिषा पवार, अभिलाषा जयकर, दिनेश खैरणार, केशव ढिकले, विशाल अहिरे, प्रमोद साळुंके यांच्यासह वर्ग चारचे दिलीप वाघ, कैलास पेलमहाले, देवराज ससाणे, संजय गुळवे, सुरेश कर्णे, धनवीर चंडालिया, अनिल पगारे व जय पथरोळ यांनी या महिलेची सुश्रुषा केली.

याचमुळे रंजना खरपडे हिच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होऊन ९ दिवसांनी डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे तिच्या नातलगांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसांडून वाहत होता. तर, रंजना गंभीर स्थितीतून बचावल्याचे समाधान उपचार करणाऱ्या डॉ. भांगरे यांच्यासह स्टाफच्या चेहऱ्यावर होता.

Saved Patient with Doctor
Heatstroke Remedy : सावधगिरी हाच उष्माघातावरील उपाय! उन्‍हाच्‍या तडाख्यापासून अशी घ्या काळजी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.