Nashik ZP News: शिक्षणाधिकारींचा (मा) पदभार तूर्तास उदय देवरेंकडेच राहणार

ZP Nashik news
ZP Nashik newsesakal
Updated on

Nashik ZP News: जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारीपदाबाबत निर्माण झालेला पेच सुटला असून तूर्त उपशिक्षणाधिकारी उदय देवरे यांच्याकडे दिलेला पदभार कायम राहणार आहे.

शिक्षणाधिकारी प्रवीण पाटील यांच्या पदभाराबाबत शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त झाले असून यात देवरेंकडे पदभार ठेवण्यात यावा असे सांगितल्याचे समजते. (post of secondary education officer of ZP will remain with Uday Deore nashik news)

शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी पाटील यांच्या विरोधात भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने त्यांचा पदभार काढून घेततो माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी उदय देवरेंकडे सोपविला. त्यानंतर ते वैद्यकीय रजेवर गेले होते. पाटील यांनी उच्च न्यायालयाकडून जामिन घेत १३ नोव्हेंबरला ते जिल्हा परिषदेत हजर झाले.

मात्र पाटील यांना प्रशासनाने पदभार घेण्यापासून रोखले. पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असल्याने या कार्यकाळात त्यांच्याकडे पदभार दिल्यास फेरफार होऊ शकतो.

ZP Nashik news
Nashik ZP News: जि.प.चे विभागप्रमुख फिल्डवर; प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या मंगळवारी तालुक्यांना भेटी

यासाठी पाटील यांना पदभार देण्याबाबत शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले.

२० नोव्हेंबरला पाटील नियमितपणे कार्यालयात दाखल झाले. परंतू, त्यांचा पदभार काढण्यात आलेला असल्याने त्यांना रोखण्यात आले. त्यावेळी पाटील यांनी आपल्याला पदभार काढला असल्याचे पत्र मिळाले नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे पदभाराचा पेच निर्माण झाला होता.

ZP Nashik news
Nashik Kalyan Local News: इन्स्पेक्शनवरच कल्याण लोकलचे भवितव्य

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.