नाशिक : गुंतवणुकीचे अनेक पर्याय आज उपलब्ध झाले आहेत. मात्र तरीही सुरक्षित गुंतवणुकीसाठी ज्येष्ठांचा ओढा आजही टपाल खात्याकडेच कायम असल्याचे चित्र आहे. त्यातच अनेक योजनांमधील व्याजदरात वाढ झाली आहे.
सुरक्षिततेबरोबरच घसघशीत परतावा देणाऱ्या योजना म्हणून टपाल खात्याच्या सर्वच योजना मध्यमवर्गीयात लोकप्रिय होत्या. कालांतराने व्याजदर घटत गेल्याने यातील गुंतवणूकही घटत गेली. त्यातच कधीकाळी गुंतवणूक वाढीसाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र व राज्य शासनाने त्याकडे काणाडोळा केल्याने मासिक प्राप्ती योजना, राष्टीय बचत प्रमाणपत्रे, किसान विकास पत्रे यातील गुंतवणूक घटत गेली.
नव्वदच्या दशकापर्यंत ही गुंतवणूक वाढण्यासाठी अल्पबचत संचानलयातर्फे मेळावेही घेतले जात होते, त्या वेळी अल्पबचत प्रतिनिधींना भरघोस प्रोत्साहन भत्ताही दिला जात होता. नंतर सतत घटणा-या व्याजदरामुळे गुंतवणूकदारांचा ओढा कमी झाला. त्यातच शासनाने मासिक प्राप्ती योजनेची मुदत संपल्यावर दिला जाणारा १० टक्के बोनसही बंद केल्याने त्यातील गुंतवणुक घटली.
हेही वाचा: या महामार्गामुळं खरंच येईल 'समृद्धी'?
पुन्हा प्रोत्साहित करणे सुरू
केंद्र सरकारने १ जानेवारी ते ३१ मार्च या पहिल्या तिमाहीसाठी मासिक प्राप्ती योजनेसह सिनिअर सिटीझन्स, गुंतवणुकदारांना दामदुप्पट परतावा देणाऱ्या किसान विकास पत्र यांच्या व्याजदरात किंचित वाढ करत गुंतवणूकदारांना पुन्हा प्रोत्साहित करणे सुरू केले आहे. मात्र पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजना, पाचवर्षीय मुदत ठेव यावर व्याजदर ‘जैसे थे’च ठेवले आहे.
नव्वदच्या दशकात यामुळे परिणाम
ऐंशी, नव्वदच्या दशकात शहरात केबीसीसह काही पतसंस्थांनी ज्येष्ठांना अधिक व्याजदराचे आमिष दाखवत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळविली. यात एचएएल, मायको, मनपासह अनेक आस्थापनांतील सेवानिवृत्तांनी मोठ्या प्रमाणावर गुंतविलेल्या कोट्यवधी रुपयांवर पाणी सोडावे लागले. आयुष्यभर नोकरी करून कमावलेले पैसे पाण्यात गेल्यावर अनेक ज्येष्ठांना आर्थिक मनस्तापासह जवळच्या आप्तांची नाराजीही भोगावी लागली.
योजनांच्या व्याजदरातील वाढ
क्रम योजना पूर्वीचे व्याजदर सध्याचे व्याजदर
१. मासिक प्राप्ती योजना ६.७ ७.१
२. सिनिअर सिटिझन्स ७.६ ८.०
३. राष्टीय बचत प्रमाणपत्र ६.८ ७.०
४. किसान विकास पत्रे ७.० ७.२
''टपाल खात्यातील गुंतवणूक सर्वाधिक सुरक्षित असून ग्राहकांनी विशेषत: ज्येष्ठांनी या योजनेचा व वाढीव व्याजदराचा लाभ घ्यावा.'' - मोहन अहिरराव, प्रवर डाक अधीक्षक, नाशिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.