Nashik : टपाल विभागाने उचलला मुलींच्या लग्नाचा विडा

Senior Officer Mohan Aherrao, Ramsingh Pardeshi while giving passbook to the beneficiary of Sukanya Yojana.
Senior Officer Mohan Aherrao, Ramsingh Pardeshi while giving passbook to the beneficiary of Sukanya Yojana.esakal
Updated on

जुने नाशिक : आई- वडिलांना सर्वात जास्त काळजी असती ती मुलींच्या लग्नाची. टपाल विभागाच्या सुकन्या योजनेने (sukanya samruddhi scheme) त्यांची ती काळजी कमी करण्याचे काम केले आहे. २०१४ मध्ये टपाल विभागाकडून (Postal Department) सुकन्या योजना सुरू झाली. नाशिक विभागात याअंतर्गत गेल्या सात वर्षात विविध ३३ टपाल कार्यालयांमध्ये सुमारे २९ हजार ६७ खाते उघडण्यात आले आहे. या माध्यमातून सुमारे १७१ कोटी, ६७ लाख २७ हजार ५९८ रुपयांच्या ठेवी विभागात झाल्या आहेत. (postal department sukanya samruddhi yojana for girls marriage nashik news)

एक दिवसाच्या वयापासून ते दहा वर्ष वयापर्यंत खाते उघडता येते. आई वडील त्यांच्या आर्थिक परिस्थितीनुसार रक्कम भरू शकतात. पंधरा वर्षे त्यांना रक्कम भरावी लागते. पुढील सहा वर्ष टपाल विभागाकडून आवश्यक ती पूर्तता केली जाते. २१ व्या वर्षी त्या मुलीस विवाह सोहळ्यानिमित्त केवळ तिच्याच सहीने संपूर्ण रक्कम मिळते. दरम्यान, त्यापूर्वी मुलीचा विवाह ठरला तर पंधरा वर्ष भरलेली रक्कम त्यावरील व्याज अशी संपूर्ण रक्कम परत मिळते. आई- वडिलांची काळजी नाहीशी होऊन विवाह सोहळा थाटामाटात पार पडतो. त्यामुळे नागरिकांनीदेखील या योजनेस पसंती दर्शवत खाते उघडले आहे. विभागात जीपीओ टपाल कार्यालयासह ३३ टपाल कार्यालयात गेल्या सात वर्षात सुमारे २९ हजार ६७ खाते उघडण्यात आली. त्यातून सुमारे १७१ कोटी, ६७ लाख २७ हजार ५९८ च्या ठेवी टपाल कार्यालयात नागरिकांनी ठेवल्या आहेत.

शिक्षणासाठी आर्थिक मदत

अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर एखाद्या मुलीस लग्न न करता पुढील शिक्षण घ्यावयाचे असेल तर त्यासाठी देखील योजनेच्या खात्यात असलेल्या रकमेपैकी ५० टक्के रक्कम आर्थिक मदत म्हणून लाभार्थी मुलीस मिळू शकते. योजनेच्या माध्यमातून आई-वडिलांनी ठेवलेल्या ठेवीतून मुलीच्या लग्न आणि शिक्षणाचा दोन्ही खर्च भागतो.

Senior Officer Mohan Aherrao, Ramsingh Pardeshi while giving passbook to the beneficiary of Sukanya Yojana.
पोषण आहारात आढळली अळी; 325 विद्यार्थी उपाशीच गेले घरी

"योजनेत मुलीस आर्थिक सुरक्षितता लाभत असते. तिचे लग्नाचे वय झाले किंवा शिक्षण करावयाचे असेल तर तिला कोणावरही अवलंबून न राहता. सुकन्या योजनेत आई-वडिलांनी ठेवलेल्या रकमेतून आणि त्यावर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून दोन्ही खर्च भागविणे शक्य होते."

- रामसिंग परदेशी, वरिष्ठ पोस्ट मास्तर, जीपीओ टपाल कार्यालय

Senior Officer Mohan Aherrao, Ramsingh Pardeshi while giving passbook to the beneficiary of Sukanya Yojana.
स्मार्टसिटी अभियंता मारहाण प्रकरणी चौघे ताब्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.