डाक विभाग करणार आधारला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी लिंक

Adhar link
Adhar linkesakal
Updated on

नाशिक : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त नाशिक डाक विभागाने पोस्टमन, डाकसेवक यांच्या माध्यमातून विभागातील सर्व डाक कार्यालयात युआयडीएआयच्या (UIDAI) सीईएलसी (CELC) ॲपद्वारे नागरिकांना आधारकार्डला मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी अद्ययावत करण्याची सुविधा सुरू केली आहे. त्या अनुषंगाने १० व ११ डिसेंबरला विशेष मोहीम राबविण्यात येणार असून, या सेवेचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन अहिरराव यांनी सांगितले.

विभागातील सर्व डाक कार्यालयात ही सुविधा उपलब्ध करण्यात आली असून या सेवेमुळे नागरिकांना आधारकार्डला मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी लिंक करता येणार आहे. त्याअनुषंगाने नाशिक विभागातील सर्व नागरिकांनी तसेच मोठ्या हौसिंग सोसायटीचे अध्यक्ष किंवा सचिव यांनी सर्व रहिवाशांसाठी तसेच मोठ्या आस्थापना किंवा कार्यालयांचे प्रमुखांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी एकत्रितपणे एकाच वेळेस अद्ययावत माहिती लिंक करण्याकरिता जवळच्या डाक कार्यालयाशी अथवा पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा.

Adhar link
उज्वल भविष्यासाठी पोस्ट विभागा‍च्या योजनांचा लाभ घ्‍या : उदयनराजे
Adhar link
अबब! स्ट्रीट लाईटचे वीजबिल पाहून ग्रामपंचायतींचे डोळे पांढरे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.