महिला तलाठी विनयभंग प्रकरण : तात्पुरत्या बदलीला स्थगिती

woman talathi
woman talathiesakal
Updated on

नाशिक : नियम डावलून बदली केल्याप्रकरणी दाद मागणाऱ्या महिला तलाठ्याकडे (woman talathi) येवल्याच्या प्रांताधिकाऱ्यांनी शरीरसुखाची मागणी केल्याचा आरोप करत बदली प्रकरणी मॅटमध्ये धाव घेणाऱ्या महिला तलाठ्याच्या याचिकेवर सोमवारी (ता. २३) सुनावणी झाली. त्यावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या इच्छेला आपण दाद दिली नसल्यानेच त्यांनी आपली बदली केल्याचा आरोप संबंधित तलाठी महिलेने केला आहे. या प्रकरणी त्या महिलांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली

प्रांताधिकाऱ्यांच्या इच्छेला दाद दिली नसल्याने बदली; महिलेचा आरोप

नियमबाह्य पद्धतीने आपली बदली नांदगाव तालुक्यात केली असून, प्रांताधिकाऱ्यांच्या इच्छेला आपण दाद दिली नसल्यानेच त्यांनी आपली बदली केल्याचा आरोप संबंधित तलाठी महिलेने केला आहे. या प्रकरणी त्या महिलांनी थेट मॅटमध्ये धाव घेतली. मॅटने २३ ऑगस्टपर्यंत बदलीला स्थगिती दिली होती. त्यानुसार सोमवारी यावर सुनावणी झाली. प्रांताधिकाऱ्यांनी मुदतपूर्व बदल्या करताना, बदल्यांचा कायदा २००५ च्या कलम ४ (५) नुसार नजीकच्या वरिष्ठ सक्षम प्राधिकारी म्हणजेच जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व मान्यता घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे बदल्या या कायद्याच्या कसोटीवर नियमबाह्य आहेत, असे निरीक्षण मॅटच्या न्यायमूर्ती मेधा गाडगीळ यांच्या खंडपीठाने नोंदविले आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी ७ सप्टेंबरला होणार असून, प्रांताधिकाऱ्यांनी ९ ऑगस्टच्या बदली आदेशाच्या अंमलबजावणीस मॅटने स्थगिती दिली आहे. महिला तलाठ्यातर्फे अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी युक्तिवाद केला, तर राज्य शासनातर्फे अ‍ॅड. क्रांती गायकवाड यांनी बाजू मांडली.

woman talathi
हेल्मेटमुळे प्राण वाचलेल्या तुषारची भावनिक प्रतिक्रिया
woman talathi
भावलीपाठोपाठ भाम धरणही ओव्हरफ्लो! इगतपुरी तालुक्याला दिलासा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.