Teacher Transfer : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत सहाव्या टप्प्यात २५३ प्राथमिक शिक्षकांच्या अन्यायकारक बदल्यांना मुंबई उच्च न्यायालयाने ७ जूनपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे बदली पिडीत शिक्षकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. (Postponement of unfair transfer of teachers till June 7 nashik news)
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
या संदर्भात प्राथमिक शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. विस्थापित नसलेल्या शिक्षकांच्या बदल्या या टप्प्यात झाल्याने कमालीची नाराजी पसरली होती.
या प्रक्रियेतील अनेक त्रुटी याचिकाकर्त्यांच्या वकीलांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या. त्यानुसार ही स्थगिती देण्यात आली.
दरम्यान, सहाव्या टप्प्यातील अन्यायकारक बदल्यांचा प्रश्न शासन स्तरावर व नंतर न्यायालयीन लढा देण्यासाठी संघाचे राज्य नेते अंबादास वाजे, जिल्हाध्यक्ष अर्जुन ताकाटे, धनराज वाणी, निंबाजी बोरसे, धनंजय आहेर, प्रशांत शेवाळे, रमेश गोहिल, संजय शेवाळे, बाजीराव सोनवणे यांनी प्रयत्न केले. न्यायमूर्ती जी. एस. पटेल व न्यायमूर्ती नीला गोखले यांच्यासमोर सुनावणी झाली. आता या प्रकरणी सात जूनला सुनावणी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.