नुसती मलमपट्टी नको, पक्का व रूंद रस्ता करा; नागरिकांची मागणी

Patholes
Patholesesakal
Updated on

कसबे सुकेणे (जि. नाशिक) : ओझर ते कसबे सुकेणा या जवळपास अकरा किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणासह डांबरीकरण करावे, रस्त्यावरील प्रचंड प्रमाणातील खड्डे तातडीने बुजवावेत आणि रस्त्यासाठी दीर्घकालीन धोरण ठरवून कायमस्वरूपी भक्कम स्वरूपाचा रस्ता तयार करावा अशी मागणी होत आहे.

रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य

ओझर ते सुकेणा हा प्रमुख जिल्हा मार्ग असून अनेक गावे या रस्त्याने जोडली गेली आहेत. या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. आता हा रस्ता आता कमी पडत असून रस्त्याच्या दोन्ही बाजूला साईडपट्ट्या भरून कायमस्वरूपी मोठा रस्ता तयार होणे गरजेचे आहे. ओझर येथील एचएएल कंपनी व येथील विमानतळ या दृष्टिकोनातून कसबे सुकेणामार्गे या रस्त्याचा मोठा उपयोग केला जातो. हा रस्ता नाशिककडे जाणारा प्रमुख मार्ग असूनही त्याच्या देखभाल व दुरूस्तीकडे लक्ष दिले जात नाही. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठी वळणे आहेत, त्यामुळे मोठे अपघात घडत असून रस्त्यावर प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य आहे. सध्या तात्पुरत्या स्वरूपात हे खड्डे भरले जात असून त्याऐवजी हा रस्तताकायमस्वरूपी पक्का आणि रूंद करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या रस्त्यावर तात्पुरती मलमपट्टी करण्याऐवजी व्यापक मोहीम राबवून कायमस्वरूपी भक्कम स्वरूपाचा मोठा डांबरीकरण असणारा रस्ता करावा अशी मागणी आजूबाजूच्या गावातील नागरिकांनी केली आहे.

Patholes
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात Yellow alert; उकाडा वाढणार...

''कसबे सुकेणे ते ओझर या रस्त्यावरील वाहतूक वाढली असून त्यातुलनेत रस्ता अपुरा पडत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात साईडपट्ट्या भरून तो कायमस्वरूपी रुंदीकरण होण्याची गरज आहे.'' - अनिरुद्ध पवार, शिवसेना कार्यकर्ता व ग्रामस्थ दात्याणे

Patholes
नाशिक जिल्ह्यात यंदा कांद्याचे बंपर पिक; 2 लाख हेक्टरवर विक्रमी लागवड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()