Poultry Expo 2023 : नाशिकमध्ये शनिवारपासून ‘पोल्ट्री एक्स्पो'

Poultry Hens
Poultry Hens esakal
Updated on

नाशिक : येथील ठक्कर डोममध्ये शनिवारपासून (ता. २५) तीनदिवसीय ‘पोल्ट्री एक्स्पो' होत आहे.

हैदराबादचे तेजस्वी इव्हेन्टस्, छत्तीसगडचे पीपल्स फॉर पोल्ट्री आणि वेस्टर्न इंडिया पोल्ट्री असोसिएशनतर्फे होणाऱ्या प्रदर्शनाचे उदघाटन शनिवारी (ता.२३) सकाळी साडेदहाला पालकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) , केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते होईल. (Poultry Expo 2023 from 25 march nashik news)

आमदार ॲड. माणिकराव कोकाटे, सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पशुसंवर्धनचे प्रादेशिक सहआयुक्त डॉ. बाबूराव नरवाडे, अभिनेते मकरंद अनासपुरे, महाराष्ट्र पोल्ट्री फार्मर्स अँड ब्रिडर्स असोसिएशनचे अध्यक्ष संजय नलगीरकर, व्यंकटेश्‍वरा ग्रुपचे महाव्यवस्थापक डॉ. पी. जी. पेडगावकर हे यावेळी उपस्थित राहतील.

ग्रामीण आणि निमशहरी भागातील कुक्कुटपालन उत्पादकांना व्यवसायात विकसित होत असलेल्या आधुनिक वैज्ञानिक तंत्रांची माहिती देणे या उद्देशाने प्रदर्शन हैदराबाद, कोलकत्ता, बंगळूर अशा महानगरांमधून होतात. नाशिकमधील प्रदर्शनात स्थानिक, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील ८० कंपन्यांचे स्टॉल्स असतील. त्यात कुक्कुटपालन खाद्य, औषधे, उपकरणे उत्पादित करणाऱ्या प्रमुख कंपन्या असतील.

हेही वाचा : एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

Poultry Hens
Police Recruitment : नाशिक ग्रामीणच्या पोलिस शिपाई उमेदवारांची 'या' तारखेला लेखी परीक्षा

कुक्कुटपालन उत्पादने, अंडी, चिकन याविषयीचे सर्वसामान्यांच्या मनातील गैरसमज दूर करणे, त्यांची दैनंदिन आहारातील उपयुक्तता समजावून सांगणे हा प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. शाळेतील भोजनामध्ये अंड्यांचा समावेश करण्याची विनंती राज्य सरकारला करण्यात येणार आहे. शिवाय अंगणवाड्यांमधील माध्यान्ह भोजन हेही वैशिष्ट्य असेल.

प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी (ता. २६) कुक्कुटपालन शास्त्रज्ञ, तज्ज्ञांची कुक्कुटपालन व्यवस्थापन, रोग आणि निदान अशा विषयांवर व्याख्याने होतील. सोमवारी (ता. २७) प्रदर्शनाचा समारोप होईल. प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, हरियानामधील जवळपास आठ हजार कुक्कुटपालन उत्पादक सहभागी होण्याची आयोजकांना अपेक्षा आहे.

Poultry Hens
Ramadan Festival: चंद्रदर्शन होताच तरावीहच्या नमाजला सुरवात; साडेचारशे मशीद, उर्दू शाळा, घराघरात होणार पठण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()