मालेगाव (जि. नाशिक) : शहर व तालुक्यात सोमवारी (ता. १३) सायंकाळी जोरदार पावसाने (Heavy Rains) हजेरी लावली. मुसळधारेमुळे शहरातील पूर्व भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पाणी शिरल्याने रहिवाशांची धावपळ उडाली. गटारींचे व पावसाचे सांडपाणी रस्त्यावर आल्याने उंच सखल भागात पाणी साचले. पाणीच पाणी चोहीकडे असे चित्र निर्माण झाले होते. बहुसंख्य भागात वीजपुरवठा खंडित (Power Outrage) झाला होता. मुसळधारेने सर्वच घटकांची व प्रामुख्याने रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांची दाणादाण उडाली. (Power outage due to heavy rains in Malegaon Nashik News)
शहरातील नववसाहती, कच्च्या रस्त्यांवर चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. झोपडपट्टीवासीयांची घरात शिरलेले पाणी काढताना दमछाक झाली. शहरातील सर्व रस्त्यांवर पाणी साचले होते. बसस्थानक परिसरातील गटार ओसंडून वाहत असल्याने बसस्थानक आधार व परिसरात पाण्याची तळी तयरा झाली होती. पावसाच्या पाण्यामुळे रस्त्यांवरील खड्डे दिसेनासे झाले होते. त्यातच वीजपुरवठा खंडित झाल्याने खड्ड्यात वाहनेही आदळत होते. पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळाला. हवेत गारवा निर्माण झाला होता. तालुक्यातील विविध भागांत पाऊस झाला. शेतकऱ्यांना आता पेरणीचे वेध लागले आहेत. वादळी वाऱ्यामुळे चाळींमध्ये साठवून ठेवलेला कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ उडाली. वादळी वाऱ्यामुळे काही घरांची पत्रे उडाली. वृक्ष उन्मळून पडले. वीजतारांवर फांद्या पडल्या. अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.