Nashik: परीक्षा केंद्रावर वीजपुरवठा वारंवार खंडित! विद्यार्थ्यांचा गोंधळ; अतिरिक्त पोलिस कुमक बोलावून पुन्हा परीक्षा

Police personnel present and candidates going for the re-examination after chaos broke out during the recruitment examination of Mazgaon Dock Sheep Builders Limited on Sunday.
Police personnel present and candidates going for the re-examination after chaos broke out during the recruitment examination of Mazgaon Dock Sheep Builders Limited on Sunday.esakal
Updated on

Nashik : दिंडोरी रोडलगतच्या नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयात माझगाव डॉक शीप बिल्डर्स लिमिटेड भरतीची परीक्षा सुरू असताना केंद्रावर तीनवेळा वीजपुरवठा खंडित होऊन सर्व्हर बंद पडले.

परीक्षेच्या वेळात विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्याने त्यांनी रविवार (ता. ५) सकाळी अकराच्या सुमारास गोंधळ घातला.

या वेळी अतिरिक्त पोलिस कुमक बोलावून व ही परीक्षा पुन्हा घेण्यात येईल, असे सांगून विद्यार्थ्यांना शांत करण्यात आले. त्यानुसार पुन्हा दुपारी चारला परीक्षा घेण्यात आली. (Power supply cut repeatedly at exam center Confusion of students mazgaon dock ship builders Reexamination by calling additional police officers Nashik)

माझगाव डॉक शीप बिल्डर्स लिमिटेड यांच्या वतीने विविध ३५ प्रकारच्या पदांसाठी ५३१ जागांची भरती प्रक्रिया सुरू आहे. या अंतर्गत आवश्यक असलेल्या ऑनलाइन परीक्षेसाठी या केंद्रावर एक हजार ३०० परीक्षार्थींची व्यवस्था करण्यात आली होती.

राज्यभरातील विविध भागांतून आलेले हे विद्यार्थी व त्यांचे पालक नाशिकला मुक्कामी होते. विद्यार्थी परीक्षा केंद्रावर वेळेत उपस्थित होते. सकाळी नऊ ते साडेदहा व दुपारी बारा ते दीड अशा दोन बॅचमध्ये परीक्षा घेण्यात येत होती.

सकाळच्या सत्रात पहिली परीक्षा सुरू झाल्यानंतर दहाला अचानक वीजपुरवठा खंडित झाला. त्यात यूपीएस सिस्टिमदेखील नादुरुस्त होती. त्यानंतर जनरेटर सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्यातही डिझेल नसल्याचे आढळून आले. लाइट जाण्याचा हा प्रकार सलग तीनवेळा घडल्याने परीक्षार्थींना अडचणीचा सामना करावा लागला.

Police personnel present and candidates going for the re-examination after chaos broke out during the recruitment examination of Mazgaon Dock Sheep Builders Limited on Sunday.
Gram Panchayat Election Result: महायुतीचा बोलबाला, अजित पवार गटाचा दबदबा; महाविकास आघाडीतील पक्षांना समान संधी

या वेळी संतप्त परीक्षार्थी व पालकांनी परीक्षा केंद्रावर गोंधळ घालण्यास सुरवात केली. आधीच पोलिस कर्मचारी केंद्रावर उपस्थित होते. घटनेनंतर आणखी पोलिसांचा ताफा दाखल झाला व परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.

परीक्षा सुरु असताना अधूनमधून सर्व्हर बंद पडत होते. तसेच परीक्षेच्या नियोजित वेळेच्या अगोदरच परीक्षार्थींचा पेपर आपोआप जमा झाल्याचा प्रकार घडल्याचे परीक्षार्थींनी सांगितले.

या प्रकाराने संतप्त झालेल्या विद्यार्थी व पालकांना परीक्षा केंद्रावर गोंधळ घातला. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली.

पंचवटी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र सपकाळे, सहायक निरीक्षक योगेश माळी व पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी विद्यार्थी-पालक व परीक्षा केंद्रप्रमुखांचे म्हणणे ऐकून घेत मध्यस्थी केली.

"पहिल्यांदा पुरवठा खंडित झाला व पुन्हा सुरळीत झाल्यावर परीक्षा सुरळीत सुरू झाली. मात्र पुन्हा दुसऱ्यांदा वीजपुरवठा खंडित झाला, तेव्हा सर्व्हर डाउन झाले होते. मात्र जेव्हा तिसऱ्यांदा पुन्हा वीजपुरवठा खंडित झाला व पुन्हा सुरळीत होताच पेपर आपोआप सबमिट झालेला होता. अनेकदा वीजपुरवठा खंडित झाल्यानेच परीक्षा देताना अडचणी निर्माण झाल्या."

- ललित मराठे, जळगाव

"सकाळी नऊला सुरू झालेली परीक्षा व्यवस्थितरीत्या सुरू होती. मात्र दहाला अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने परीक्षार्थींचा गोंधळ झाला. महाविद्यालयातील यूपीएस बंद असल्याने सर्व संगणक बंद झाले. मात्र काही वेळाने पुरवठा सुरळीत झाल्यानंतर ऑनलाइन परीक्षा पेपर जिथे थांबला होता तेथून पुन्हा सुरू झाला. ज्या विद्यार्थ्यांची परीक्षा बाकी होती, त्यांच्यासाठी पुन्हा परीक्षा घेण्यात आली." - रोशन कुमार, डेप्युटी मॅनेजर, माझगाव डॉक शीप बिल्डर्स लिमिटेड

Police personnel present and candidates going for the re-examination after chaos broke out during the recruitment examination of Mazgaon Dock Sheep Builders Limited on Sunday.
SAKAL NIE: चिमुकल्‍या मावळ्यांनी जागविला गडकिल्ल्‍यांचा गौरवशाली इतिहास!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.