Nashik News: सिन्नरच्या पूर्व भागातील वीजपुरवठा सुधारणार!शहा येथे 132 किलोवॉटच्या उपकेंद्राची चाचणी यशस्वी

MLA Manikrao Kokate along with officials after commissioning the 132 KW substation.
MLA Manikrao Kokate along with officials after commissioning the 132 KW substation.esakal
Updated on

सिन्नर (जि. नाशिक) : सिन्नर तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांना संजीवनी देण्याऱ्या शहा येथील १३२ केव्ही च्या उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. नुकतीच या केंद्रात विजेची यशस्वी चाचणी घेण्यात आली. त्यामुळे पुढील १५ दिवसांत पूर्व भागाला या उपकेंद्रातून वीजपुरवठा सुरू होणार असल्याने शेतकऱ्यांची विजेची समस्या कायमची दूर होणार आहे.

अद्याप शहा ते वावी उपकेंद्रांना जोडणाऱ्या वीजवाहिनीचे काम पूर्ण न झाल्याने वावी व पाथरे ही उपकेंद्र जोडता आली नसून येत्या १५ दिवसात तेही काम पूर्ण झाल्यानंतर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते केंद्राचे उद्घाटन होणार आहे. (Power supply in eastern part of Sinnar will improved Test of 132 KW substation at Shaha successful Nashik News)

मुसळगाव, माळेगाव व सिन्नर येथे असलेल्या १३२ केव्ही उपकेंद्रावरून संपूर्ण सिन्नर तालुक्यात वीज पुरवठा केला जात असल्याने पूर्व भागाला अत्यंत कमी दाबाने वीज पुरवठा होत होता. शहाच्या १३२ केव्ही उपकेंद्राचा प्रश्न मार्गी लागल्याने त्यामुळे या उपकेंद्राचे काम आज पूर्णत्वास गेले आहे.

पुर्व भागातील शहा, निमगाव, देवपूर हे ३३ केव्ही उपकेंद्र शहा १३२ केव्ही उपकेंद्राला जोडल्याने व पुढील १५ दिवसात वावी व पाथरे ही उपकेंद्र जोडणार असल्याने पूर्व भागाबरोबरच संपूर्ण सिन्नरचा विजेच्या दाबाचा, सुरळीत वीज पुरवठ्याचा, रोहित्र जळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. गुरुवार व शुक्रवारी शहा येथील उपकेंद्राची चाचणी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे.

केवळ शेतकऱ्यांना शेतीच्या ऐन रब्बी हंगामात सुरळीत वीजपुरवठा व्हावा म्हणून ही उपकेंद्र जोडण्यात आलेली आहे. उपकेंद्राची यशस्वी चाचणीप्रसंगी आमदार माणिकराव कोकाटे, माजी जिल्हा परिषद सदस्या सिमंतीनी कोकाटे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा : आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

MLA Manikrao Kokate along with officials after commissioning the 132 KW substation.
Nashik News: रामतीर्थावर गौतम ऋषींची 800 वर्षांपूर्वीची मूर्ती! तीर्थजल कमी झाल्यावर मूर्तीचे घडते दर्शन

असा होणार गावांचा फायदा

देवपूर व पाथरे अवघ्या बारा किलोमीटरच्या आसपासच्या गावांना कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्याची अडचण कायमस्वरूपी दूर होणार आहे. त्याचा २० हजार शेतीपंपांना प्रत्यक्ष फायदा होणार आहे.

तालुक्यातील इतर उपकेंद्रावरील भार कमी होणार असल्याने त्यावरील शेतीपंप ग्राहकांनाही पूर्ण क्षमतेने, उच्च दाबाने आणि अखंडित वीज मिळण्यास मदत होईल. सिन्नर बरोबरच कोपरगाव तालुक्याच्या काही भागाला या उपकेंद्राचा लाभ होणार आहे.

आमदार माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांची अडचण दूर करण्यासाठी शहा उपकेंद्राचा प्रस्ताव मार्गी लावण्यासाठी शासन दरबारी कसोशीने प्रयत्न केले, त्याला यश आले आहे.

कोट गेला तर वापरणे

"शहा उपकेंद्र १३२ किलोवॉटच्या वाहिनीला जोडल्याने आज आसपासच्या गावांना विजेचा प्रश्न मिटणार आहे. शाश्वत पीक व विजेचा प्रश्न सुटल्याने शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे. पाणी अन वीज या दोन्ही गोष्टींना पहिल्यापासून तालुक्यात प्राधान्य देत आलो आहे."

- माणिकराव कोकाटे,आमदार, सिन्नर.

MLA Manikrao Kokate along with officials after commissioning the 132 KW substation.
Ayushman Bharat Yojana : ‘आयुष्यमान’ कार्डचे 5 लाख लाभार्थ्यांना वाटप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.