Ramleela: रामलीला सराव मोठ्या जोमाने! यंदाचे 68 वे वर्ष; तिसरी, चौथी पिढीचे रामलीलेत योगदान

Ramlila artists practicing at Gandhinagar.
Ramlila artists practicing at Gandhinagar.esakal
Updated on

Ramleela : तुलसी आणि वाल्मीकी रामायणाचे मिश्रण गांधीनगरच्या रामलीला सादरीकरण केले जाते. गांधीनगरचे कलाकार गेल्या ६८ वर्षापासून रामलीला सादर करत आहे. यंदा रामलीला सराव मोठ्या जोमाने सुरू आहे.

रामायण म्हणजे मानवाचे चांगली तत्त्व, आचारविचार, धार्मिक परंपरा संस्कार शिकवते. हेच संस्कार घेऊन गांधीनगर वसाहतीची स्थापना झाल्यानंतर कामानिमित्त देशभरातून आलेले विविध जातिधर्माचे लोक या ठिकाणी स्थायिक झाले.

यातीलच काही उत्तर भारतीय, गढवाली समाज व महाराष्ट्रातील अधिकारी व कर्मचाऱ्‍यांनी रामलीलेची मुहूर्तमेढ रोवली. (Practicing Ramleela with great vigor 68th year Contribution of third fourth generation nashik)

प्रारंभी १९५३-५४ या दोन्ही वर्षी गांधीनगर वसाहतीतून श्रीराम, लक्ष्मणाची सवाद्य मिरवणूक काढण्यात येत. यामध्ये नारायण मल्होत्रा व सुकदेव मल्होत्रा हे बंधू श्रीराम व लक्ष्मण बनले.

या दोन्ही वर्षी परिसरातून मिळालेल्या प्रतिसादामुळे १९५५ मध्ये नाट्य स्वरूपात रामलीलेचे सादरीकरण सुरू झाले.

या दहा दिवसात रावणाचा पूर्वेतिहास, रावण कुंभकर्ण, बिभीषण वरदान, डाकू रत्नाकर (वाल्मीकी), राम जन्म, सीता जन्म, सीता स्वयंवर, अंगद-रावण संवाद, हनुमान-रावण संवाद, बिभीषण निष्कायन, राम-सुग्रीव मित्रता, सीताहरण, अशोक वाटिका, लक्ष्मण-इंद्रजित युद्ध आदी प्रसंगांचे सादरीकरण करण्यात येते.

Ramlila artists practicing at Gandhinagar.
NMC News: महापालिका रुग्णालयाच्या ऑडिटच्या सूचना; नांदेडच्या घटनेमुळे प्रशासन अलर्ट मोडवर

रामलीलेत विविध जातिधर्माचे लोक व हौशी कलावंत एकत्रित काम करतात. रामलीलेच्या माध्यमातून एकप्रकारे राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते. कित्येक कुटुंबातील तिसरी, चौथी पिढी रामलीलेत योगदान देत आहेत.

काम करणारे सर्व तंत्रज्ञ, कलावंत विनामोबदला काम करतात. १९६० मध्ये रामलीला समितीची स्थापना केली. पीडब्ल्यूडीचे तत्कालीन मुख्य अभियंता सरदार महेंद्रसिंग हे प्रथम अध्यक्ष होते. १९५९ ते १९६५ काळात गांधीनगर येथील वेल्फेअर क्लब हॉलमध्ये रामलीलेचे सादरीकरण होत.

याच दरम्यान एकदा फिरत्या रंगमंचावरही काही दृश्यांचे सादरीकरण केल्याचे काही जुने कलावंत सांगतात. दरवर्षी दसऱ्‍याच्या दिवशी हे दृश्य बघण्यासाठी शहर परिसरातून सुमारे ५० ते ६० हजार लोक येतात.

"दरवर्षीप्रमाणे मोठ्या जोमाने रामलीला सराव सुरू आहे. सायंकाळी सर्व कलाकार गांधीनगर येथे एकत्र येऊन सराव करतात. संवाद पाठ करण्यासाठी प्रत्येक कलाकाराला वेगळी स्क्रीप्ट दिलेली आहे. सर्व जातिधर्माचे कलाकार काम करतात."- हरीश परदेशी, दिग्दर्शक

Ramlila artists practicing at Gandhinagar.
NMC News: गोदावरी, उपनद्यांच्या खाच-खळग्यात ‘एडिस’ अळी! डेंगीची धास्ती; औषध, धूर फवारणी आवश्‍यक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()