Nashik : पैसे परत न करणाऱ्या लाभार्थ्यांच्या उताऱ्यावर चढणार बोझा

PM Kisan Sanman Nidhi yojana
PM Kisan Sanman Nidhi yojanasakal
Updated on

नाशिक : करदाते (Tax Payers) असतानादेखील प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी (Pradhan Mantri Kisan Sanman Yojana) ऑनलाइन अर्जात (Online Application) चुकीची माहिती भरत लाभ घेतलेल्या नाशिक तालुक्यातील ५३२ अपात्र लाभार्थ्यांनी शासनाकडून मिळालेली रक्कम परत केली आहे. पुढील सात दिवसांमध्ये अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचे पैसे परत शासन तिजोरीत जमा न केल्यास त्यांच्या सात बारा उताऱ्यावर बोझा चढविला जाणार असल्याची माहिती नाशिक तालुका तहसीलदार अनिल दौंडे यांनी दिली आहे. (Pradhan Mantri Kisan Sanman scheme Nashik News)

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी नाशिक तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज केले होते. अपात्र असतानादेखील अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन माहिती चुकीची भरल्याने त्यांना योजनेतंर्गत पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले होते. या शेतकऱ्यांच्या अर्जाची छाननी केली असता, यामध्ये १ हजार ०२७ शेतकरी हे कर भरत असल्याची माहिती समोर आली होती. यासह २५८ अर्जदार शेतकऱ्यांना विविध कारणामुळे या योजनेसाठी अपात्र ठरविण्यात आले होते. परंतु, त्यांनादेखील योजनेचा लाभ मिळाला होता. अखेर या सर्वांना प्रशासनाकडून नोटिसा बजाविण्यात आल्या होत्या. नोटिशीनुसार कर भरत असलेल्या १ हजार ०२७ लाभार्थ्यांपैकी ४७५ आणि विविध कारणास्तव अपात्र ठरविण्यात आलेल्या २५८ लाभार्थ्यांपैकी ५७ लाभार्थी, असे एकूण ५३२ लाभार्थ्यांनी शासनाकडून योजनेतंर्गत मिळालेले संपूर्ण पैसे परत शासनास दिले आहे.

PM Kisan Sanman Nidhi yojana
12वीनंतर पदवी शिक्षण; पुणे विद्यापीठाच्‍या 45 हजार जागा उपलब्‍ध

मात्र, अजूनही ८५३ अपात्र लाभार्थ्यांनी योजनेचे पैसे परत केलेले नाही. यामुळे तहसीलदार अनिल दौंडे यांनी सर्व अपात्र लाभार्थ्यांना पैसै भरण्यासाठी सात दिवसांची मुदत दिली आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व संबंधित तलाठी कार्यालयात, तसेच तहसील कार्यालयात अपात्र लाभार्थ्यांची यादी उपलब्ध आहे. अपात्र लाभार्थ्यांनी तहसील कार्यालय नाशिक येथे येऊन प्रलंबित असलेली योजनेची रक्कम शासनास भरणा करावी. वेळेत आपले पैसे जमा न केल्यास आठव्या दिवसापासून अपात्र लाभार्थ्यांच्या ७/१२ उताऱ्यावर बोजा चढविण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

PM Kisan Sanman Nidhi yojana
ZP गट गण प्रारूप रचनेवर हरकतींचा पाऊस; एकूण 93 हरकती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()