Nashik News : सावित्रीबाई फुले विद्यापीठाचा विद्यार्थी येथील शुभम श्रीधर भंडारे याने बंगळुरू येथील खेलो इंडियातील तीन हजार मीटर स्टीपलचेस अडथळा स्पर्धेत घोट्याच्या दुखापतीमुळे अपयश आले होते.
त्यावर मात करत त्याने यंदा लखनौ येथील खेलो इंडिया स्पर्धेत पुन्हा तीन हजार मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात सुवर्णपदक जिंकले.
त्याच्या या कामगिरीचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकत्याच झालेल्या 'मन की बात'मध्ये करीत त्याचे कौतुक केले आणि देशभरात शुभमचे नाव पुन्हा चर्चेत आले.(Praise for Shubham in Mann Ki Baat program Steeplechase gold medal in Khelo India Nashik name raised as Prime Minister took notice Nashik News)
बंगळुरू येथील २०२२ मधील स्पर्धेत दुसऱ्या स्पर्धकाच्या टोकदार बुटाचा पाय पडल्याने शुभमच्या पायाच्या घोट्याला दुखापत झाली होती.
मात्र त्याने खचून न जाता त्यावर मात करीत जिद्दीने यशाला गवसणी घातली. याबाबत शुभम म्हणाला,‘कसबे सुकेणे हे माझे मूळ गाव याचा मला सार्थ अभिमान आहे. माझे आई- वडील शेती करतात.
सातवीत असल्यापासून धावायची आवड आहे, स्टीपलचेस या क्रीडा प्रकाराची ओळख मला काही वर्षांपूर्वीच झाली. त्यातील वॉटर जम्प मला खूप आवडते. मी अंडर २३ चॅम्पियनशिपमध्ये तीन हजार मीटर स्टीपलचेसमध्ये सहभाग घेतला. सुरवातीला अपयश आले. मात्र, मी हार मानली नाही.
मेहनत करीत गेलो. कुटुंबाने मला साथ दिली. माझ्या मामांनी भक्कम पाठिंबा दिला. डॉक्टरांनी यशस्वी उपचार केल्यानंतर चार महिन्यांनी मी पुन्हा चालण्याचा सराव केला आणि धावू लागलो. पुण्यातील मिनी ऑरेंज स्पोर्टस् अकॅडमीने मला प्रायोजकत्व दिले.
उपचारानंतर सर्वप्रथम जिल्हा स्पर्धा जिंकलो. राज्यस्तरावर मला राष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरविण्यात आले. छत्तीसगडमधील बिलासपूर येथे राष्ट्रीय स्पर्धेत ८ मिनिटे ५४ सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले.
ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेत सुवर्ण आणि त्यानंतर खेलो इंडिया लखनौ २०२३ मध्ये ८ मिनिटे ४३ सेकंदांत शर्यत पूर्ण करीत सुवर्णपदक जिंकलो.
मिशन ऑलिम्पिक २०२४ वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्ससाठी ट्रायलमध्ये मी उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्याचा निकाल येणे बाकी आहे. ३,००० मीटर स्टीपलचेस क्रीडा प्रकारात ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे ध्येय आहे असे शुभमने सांगितले.
"शुभमला असे वाटत होते, की मी चांगला खेळलो तर भविष्यात पंतप्रधानांना भेटण्याची मला नक्कीच संधी मिळेल. पंतप्रधानांनी ‘मन की बात' मध्ये त्याचे नाव घेतल्याने नवी ऊर्जा त्याच्या अंगात संचारली आहे. भविष्यात कुठल्याही परिस्थितीत ऑलिंपिक स्पर्धा खेळायची हे त्याचे स्वप्न आहे."
-श्रीधर भंडारे (शुभम चे वडील) कसबे सुकेणे
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.