‘मुक्‍त’ च्‍या कुलसचिवपदाचा अतिरिक्‍त पदभार देशमुखांकडे

Officers and staff greeting Prakash Deshmukh after accepting the additional post of Registrar of YCMOU
Officers and staff greeting Prakash Deshmukh after accepting the additional post of Registrar of YCMOUesakal
Updated on

नाशिक : यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या (YCMOU) कुलसचिवपदाचा अतिरिक्‍त कारभार विद्यार्थी सेवा विद्याशाखेचे संचालक प्रकाश देशमुख यांच्‍याकडे आला आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्‍याने प्रभारी कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांनी त्‍यांना कार्यमुक्‍त केले. डॉ.भोंडे यांनी कुलसचिवपदाचा कार्यभार श्री.देशमुख यांच्‍याकडे सोपविला. (Prakash Deshmukh holds additional post of Registrar of YCMOU Nashik News)

Officers and staff greeting Prakash Deshmukh after accepting the additional post of Registrar of YCMOU
नाशिक : शहरात नाकाबंदी; तरीही दुचाक्या चोरी सुरूच

यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलगुरुपदाचा कार्यकाळ ई. वायुनंदन यांनी पूर्ण केल्‍यानंतर या पदाची प्रभारी जबाबदारी राहुरी येथील महात्‍मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रशांतकुमार पाटील यांच्‍याकडे आहे. दरम्‍यान कुलसचिव डॉ.दिनेश भोंडे यांचादेखील कार्यकाळ पूर्ण झालेला होता. त्‍यानंतर एक वर्षाची मुदतवाढ घेताना त्‍यांनी सहा वर्षे या पदाची धुरा सांभाळली. येत्‍या ३१ डिसेंबरला ते निवृत्त होत असल्‍याने त्‍याआधी सहा महिने मूळ आस्थापनेच्या ठिकाणी हजर व्‍हायचे आहे. अशात डॉ.भोंडे हे अमरावती येथील तंत्रनिकेतन येथे प्राध्यापकपदी पुन्हा हजर झाले आहेत. यशवंतराव चव्‍हाण महाराष्ट्र मुक्‍त विद्यापीठाच्‍या कुलसचिवपदाचा अतिरिक्‍त कारभार विद्यापीठाच्‍या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक प्रकाश देशमुख यांच्‍याकडे सोपविण्यात आलेला आहे.

Officers and staff greeting Prakash Deshmukh after accepting the additional post of Registrar of YCMOU
राज्यात सत्तांतरानंतर पुन्हा पोलिस अधिकारी बदल्यांसाठी सक्रिय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()