Market Committee Election : छाननीत 14 अर्ज अवैध : प्रमोद हिले

Application Scrutiny Process going on Wednesday in Market Committee Hall
Application Scrutiny Process going on Wednesday in Market Committee Hallesakal
Updated on

येवला (जि. नाशिक) : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत संचालक मंडळाच्या १८ जागांसाठी आलेल्या एकूण २१७ अर्जांची बुधवारी (ता. ५) छाननी झाली. यातील १४ अर्ज विविध कारणांस्तव बाद करण्यात आले असून, २०३ अर्ज वैध ठरले आहेत. (Pramod Hile statement Market Committee Election 14 application under scrutiny invalid nashik news)

बाजार समिती सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार प्रमोद हिले यांच्या समक्ष बुधवारी छाननी झाली. एकूण १८ जागांसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. यामध्ये सोसायटी मतदार संघातील सर्वसाधारण जागेवरील भागवत राठोड हे दुबार सूचक असल्याने, इतर मागासवर्गीय जागेवरील जगन्नाथ बोराडे व गोरख आहेर यांचे जात प्रमाणपत्र नसल्याने, तर विमुक्त जाती भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्गात चिंधू गोराणे यांचा दुबार अनुमोदन असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले.

तसेच, ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण जागेवरील आकाश पवार, अनंता आहेर, अमोल येवले, देविदास चव्हाण, सरला जगताप यांनी शेतकरी नसल्याचा दाखला जोडलेला नव्हता. आर्थिक दुर्बल जागेवरील मकरंद सोनवणे यांनी दाखला जोडला नाही, तर जालिंदर कांडेकर हे दुबार अनुमोदक आहेत.

अनुसूचित जाती-जमाती गटातील प्रमोद गांगुर्डे, अभय दिवे, कृष्णा पगारे यांचेही दाखले जोडलेले नाहीत. त्यामुळे या दहा जणांचे अर्जही अवैध ठरले. दरम्यान, सोसायटी आणि ग्रामपंचायत या दोन मतदारसंघातील एकूण १४ उमेदवारी अर्ज छाननीत अवैध ठरले असून, व्यापारी व आडते मतदार संघ आणि हमाल व तोलारी मतदारसंघातील सर्वच अर्ज वैध ठरविण्यात आले.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Application Scrutiny Process going on Wednesday in Market Committee Hall
Nashik News: लोखंड, स्टीलची वाहतूक उठली जिवावर; नियम पायदळी तुडवत, उपाययोजना न करता अवैद्य वाहतूक!

तहसीलदार श्री. हिले यांनी ही माहिती दिली. छाननी कामी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विजय बोरसे, निवासी नायब तहसीलदार श्रीमती मगर, नायब तहसीलदार विवेक चांदवडकर, बाळासाहेब हावळे, संदीप काकड व चेतन चंदावार, बाजार समितीचे सचिव कैलास व्यापारे यांनी सहकार्य केले.

यांचे होणार पॅनल

दरम्यान, बाजार समिती निवडणुकीच्या उमेदवारीत माजी सभापती उषाताई शिंदे, वसंत पवार, माजी संचालक प्रमोद पाटील, माजी सभापती संजय बनकर, मोहन शेलार, अशोक मेंगाने, गणपत कांदळकर, विजय खैरनार, भास्कर कोंढरे, नंदकिशोर अट्टल, भानुदास जाधव आदी माजी पदाधिकाऱ्यांसह मातब्बरांनी अर्ज दाखल केलेले आहेत.

तर, अनेक उमेदवार नवीन आहेत. अद्याप पॅनल निर्मिती निश्‍चित झालेली नसली, तरी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट, तसेच ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांच्यात पॅनलची निर्मिती होणार आहे. मात्र, कोण कोणासोबत आणि कोणाचा कोणता पॅनल हे अद्याप अस्पष्ट असल्याने पुढील घडामोडींकडे लक्ष लागून आहे.

Application Scrutiny Process going on Wednesday in Market Committee Hall
Satyajeet Tambe : उद्योगांसाठी द्या इंडियाबुल्सच्या ताब्यातील जागा! आमदार तांबेंचा लढा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.