Nashik BJP News : भाजपमध्ये भाकरी फिरली.. शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव

 sunil bachhav, prashant jadhav, shankar wagh
sunil bachhav, prashant jadhav, shankar waghesakal
Updated on

Nashik BJP News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनेत फेरबदल करताना शहराध्यक्षपदाची सूत्रे संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली.

तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी दोन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करताना नाशिक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सुनील बच्छाव, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या अध्यक्षपदी शंकर वाघ यांची नियुक्ती करण्यात आली. (Prashant Jadhav elected as BJP city president nashik news)

भाजपच्या प्रोटोकॉल आणि प्रदेशाध्यक्ष बदलल्यानंतर स्थानिक पातळीवरदेखील बदल अपेक्षित असतात. त्याअनुषंगाने प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी विलंबाने राज्यातील शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांच्या नियुक्ती जाहीर केल्या. त्यात नाशिकची जबाबदारी प्रशांत जाधव यांच्याकडे देण्यात आली.

पक्षाचे दोनदा शहर संघटन सरचिटणीस राहिलेल्या जाधव यांच्यासाठी एवढाच एक निकष बघितला गेला. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने शहराध्यक्षपदावर नियुक्ती करताना आमदार राहुल ढिकले, स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते, माजी सभागृहनेते दिनकर पाटील, जगदीश पाटील, अनिल भालेराव, नाना शिलेदार, सुनील केदार यांच्या नावाची चर्चा होती.

परंतु आमदार किंवा खासदार असलेल्या लोकप्रतिनिधींना संघटनेची जबाबदारी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्यानंतर यांचे नाव स्पर्धेतून मागे पडले. शहराध्यक्षपदावर आपल्या मर्जीतील व्यक्ती बसवण्यासाठी आमदारांमध्ये स्पर्धा दिसून आली. परंतु प्रदेश कार्यकारिणीने जाधव यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

 sunil bachhav, prashant jadhav, shankar wagh
Dhule BJP News : शहर-जिल्हाध्यक्षपदी अंपळकर; भाजपकडून नियुक्ती

स्व-व्यक्तिमत्त्व विकसित करण्याची गरज

प्रशांत जाधव यांच्या नियुक्तीमुळे पक्षांतर्गत नव्या वादाला तोंड फुटले आहे. एक व्यक्ती एक पद असे सूत्र असताना जाधव यांच्याकडे शहराध्यक्ष पदाची दिलेली जबाबदारी व संघटन कौशल्याचा अभाव या बाबी खदखदीला कारणीभूत ठरताना दिसत आहे. दोन टर्म सरचिटणीसपद असताना जाधव यांना संघटनेवर ठसा उमटविता आला नाही.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्टेजवर बसणारा नव्हे तर कार्यकर्त्यांमध्ये जाणारा शहराध्यक्ष हवा अशी अपेक्षा होती. किमान दहा पंधरा कार्यकर्ते बरोबर घेऊन फिरणारा पदाधिकारी हवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यामुळे आता शहराध्यक्षपद सांभाळताना जाधव यांना पक्षाची धोरणे किंवा केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोचविण्याऐवजी स्व-व्यक्तिमत्त्व विकसित करण्यावरच अधिक भर द्यावा लागणार असल्याचे बोलले जाते.

ग्रामीणमध्ये विस्तार

नगर जिल्ह्या खालोखाल भौगोलिकदृष्ट्या नाशिक जिल्ह्याचा विस्तार मोठा आहे. त्यामुळे यापूर्वी दोनदा जिल्हाध्यक्ष राहिलेले केदा आहेर यांना तिसऱ्या वेळेस बाजूला करताना नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अध्यक्षपदी सुनील बच्छाव, तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघासाठी शंकर वाघ यांची नियुक्ती करून भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने नाशिकमध्ये ग्रामीण भागाकडे अधिक लक्ष केंद्रित केले आहे. त्यामुळे या दोन्ही जिल्हाध्यक्षांकडे जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये अधिकाधिक सदस्य निवडून आणण्याची जबाबदारी वाढली आहे.

 sunil bachhav, prashant jadhav, shankar wagh
Nashik Accident News : समृद्धीवर स्विफ्ट कारचा अपघात; श्रीरामपूरच्या दोघांचा मृत्यू

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.